भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले? ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:15 IST2025-08-27T17:40:08+5:302025-08-28T13:15:03+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांना 'टॅरिफ'मधून सूट दिली.

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कर लादण्यास सुरुवात केली आहे.

२४ टक्क्यांपासून सुरू झालेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे, आता ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांना टॅरिफमधून सूट दिल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पुरवण्यात जेनेरिक औषधांचे महत्त्व लक्षात घेता, ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या तात्काळ शुल्क वाढीतून भारतीय औषध उद्योगाला सूट देण्यात आली.

भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कारणावरुन अमेरिकेने हे कर लादले होते.

अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवा राखण्यासाठी जेनेरिक औषधे महत्त्वाची असल्याने भारतीय औषध उद्योगाला अमेरिकेच् टॅरिफ मधून तात्काळ शुल्क अंमलबजावणीतून वगळण्यात आली, असं सांगण्यात येत आहे.

जेनेरिक औषधे सामान्यतः खूप कमी नफ्यावर चालतात. अमेरिकेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जेनेरिक औषधांची सतत उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

५० टक्के शुल्कानंतर, भारतीय औषध निर्यातदारांनी त्यांचे शिपमेंट ऑस्ट्रेलियाला हलवण्यास सुरुवात केली, जे अमेरिकन मेडिकेअर प्रणालीच्या स्थिरतेसाठी धोकादायक मानले जात होते.

यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांना ५०% शुल्कातून सूट दिली.

अमेरिका औषध पुरवठ्यासाठी भारतावर अधिक अवलंबून आहे. अमेरिकेतील जवळजवळ अर्धी जेनेरिक औषधे भारतातून येतात.

आरोग्यसेवेची महत्त्वाची भूमिका आणि अमेरिकेतील आधीच जास्त आरोग्यसेवा खर्च पाहता, औषधांवर त्वरित जास्त शुल्क लावण्याची शक्यता कमी आहे, असा तज्ञांचा असा विश्वास आहे.