स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव माहिती आहे का? कागदपत्रांवर पाकिस्तानी नेत्यांच्याही स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:04 IST2025-03-27T13:58:26+5:302025-03-27T14:04:10+5:30
SBI Main Branch Story : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे का? नसले तरी तुम्हाला ही बँक नक्कीच माहिती असेल. या बँकेला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी बँक आहे. या बँकेच्या भारतासह जगभर शाखा आहेत. एसबीआयला बँकिंग क्षेत्राचा कणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, या बँकेबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बहुतेक लोकांना आजही माहिती नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही एसबीआय अस्तित्वात होती. मात्र, त्यावेळी तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया नव्हते. संसद मार्गावर असलेल्या ही बँक पूर्वी इंपीरियल बँक ऑफ इंडियाची शाखा होती.
इम्पीरियल बँकेचे नाव नंतर बदलण्यात आले. फाळणीपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आपली खाती या बँकेत उघडली होती. या बँकेची स्थापना ४ जानेवारी १९२६ रोजी झाली.
१०० वर्षे जुनी बँक खाती अजूनही सुरक्षित आहेत. या खात्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांच्या सह्या आहेत. ही बँक भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासाशी निगडीत आहे.
दिल्ली ब्रिटिश भारताची राजधानी बनली होती. त्यामुळे मोठ्या बँकेची गरज निर्माण झाली. त्यावेळी ही बँक १.७५ लाख रुपये खर्चून बांधली गेली. ब्रिटन वास्तूशैलीनुसार या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.
सी.डी. देशमुख, राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाक्षऱ्याही बँकेच्या रेकॉर्डमध्ये जतन केल्या गेल्या आहेत. इतकेच नाही तर माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचेही खाते याच शाखेत होते.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान लियाकत अली खान यांचेही खाते पूर्वीची इंपीरियल बँक ऑफ इंडिया आणि आताची एसबीआयमध्ये होते.