Did You Know? : जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफाच्या उभारणीत 'TATA' चा महत्त्वाचा वाटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:37 PM2021-08-26T20:37:36+5:302021-08-26T20:42:20+5:30

तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या उभारणीत भारताची अग्रगण्य कंपनी TATA यांचेही योगदान आहे.

दुबईतील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणजे बुर्ज खलिफा... २०१०मध्ये बांधण्यात आलेल्या बुर्ज खलिफानं ( The Burj Khalifa) संपूर्ण जगाचे लक्ष वेधले ते त्याच्या उंचीमुळे... जगातील सर्वात उंच इमारत म्हणून मान पटकावणाऱ्या बुर्ज खलिफाची ( The Burj Khalifa) उंची ही ८२९.८ मीटर म्हणजेच २७२२ फुट इतकी आहे.

२००४ साली बुर्ज खलिफाच्या बांधणीला सुरुवात झाली आणि पाच वर्षांत ही इमारत उभी राहिली. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला गेला.

सुरुवातीला या इमारतीचं नाव बुर्ज दुबई असे ठेवले होते, परंतु त्यानंतर त्याचे नामकरण करून अबु धाबीचे राजा व संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष खलिफा बिन जायेद अल नाहयान यांच्या नावावर ठेवले गेले. या इमारतीत ५७ लिफ्ट्स आणि ८ एस्कलेटर्स आहेत.

तुम्हाला माहिती आहे का? या इमारत उभारणीत भारताची अग्रगण्य कंपनी TATA यांचेही योगदान आहे.

२०१८ मध्ये, TATA Group च्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यावर सुरुवातीला, तुम्हाला माहिती आहे दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. परंतु आपण अंदाज लावू शकता की आमच्या कोणत्या कंपन्यांनी त्याच्या बांधकाम आणि ऑपरेशनमध्ये मदत केली? असा सवाल केला गेला होता.

त्याच ट्विटच्या खाली TATA Group ने याचं उत्तर दिलं. १९४३ साली हावडा ब्रिजपासून ते २०१०मधील बुर्ज खलिफापर्यंत, टाटा स्टीलने भारतातील आणि परदेशातील सर्वोत्तम संरचना बांधण्यास मदत केली आहे...

''होय, हे टाटा स्टील आणि व्होल्टास आहे! टाटा स्टील युरोपने ही अनोखी इमारत बांधण्यासाठी ३९,००० टन स्टील Rebarचा पुरवठा केला आणि १३,००० टन वातानुकूलन प्रणालीसह टाटा वोल्टास या इमारतीला थंड ठेवण्यास मदत करते.

Read in English