SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:02 IST2025-05-16T08:52:53+5:302025-05-16T09:02:55+5:30

SBI FD Calculator: जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर बँकांमधील मुदत ठेव (Fixed Deposit) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

SBI FD Calculator: जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर बँकांमधील मुदत ठेव (Fixed Deposit) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. यामध्ये, तुमची जमा केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते आणि निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा देते.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे एसबीआय. जर तुम्ही एसबीआयमध्ये ५ लाख रुपयांची एफडी केली तर १, २, ३ आणि ५ वर्षात तुम्हाला केवळ व्याजातून किती पैसे मिळतील हे समजून घेऊया.

एसबीआय आपल्या ग्राहकांना २११ दिवसांपासून ते १ वर्षापर्यंतच्या एफडीवर ६.५० टक्के दरानं व्याज देते. यानुसार, जर तुम्ही एका वर्षात एसबीआय एफडीमध्ये ५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला फक्त व्याजाच्या स्वरूपात ३३,३०१ रुपये मिळतील. त्याच वेळी, जर बँक ज्येष्ठ नागरिकांना ७ टक्के दरानं व्याज देत असेल तर त्यांना ३५,९३० रुपये व्याज मिळेल.

एसबीआय आपल्या ग्राहकांना २ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.७० टक्के दरानं व्याज देतं, त्यामुळे या प्रकरणात, तुम्हाला ५ लाख रुपयांच्या एफडीवर ७१,०६२ रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, जर बँक ज्येष्ठ नागरिकांना २ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७.२० टक्के दरानं व्याज देत असेल तर त्यांना ७६,७०३ रुपये व्याज मिळेल.

एसबीआय आपल्या ग्राहकांना ३ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.९० टक्के व्याजदर देते, त्यामुळे या प्रकरणात, तुम्हाला ५ लाख रुपयांच्या एफडीवर १,१३,९०७ रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, जर बँक ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७.४० टक्के दरानं व्याज देत असेल तर त्यांना १,२३,०२१ रुपये व्याज मिळेल.

एसबीआय आपल्या ग्राहकांना ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.७५ टक्के दरानं व्याज देते, त्यामुळे या प्रकरणात, तुम्हाला ५ लाख रुपयांच्या एफडीवर १,९८,७४९ रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, जर बँक ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७.२५ टक्के दराने व्याज देत असेल तर त्यांना २,१६,१३० रुपये व्याज मिळेल.