Punjab National Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७७,९४५ चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:45 IST2026-02-09T08:25:42+5:302026-02-09T08:45:56+5:30
Punjab National Bank Investment: भारतात केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली एकूण १२ सरकारी बँका कार्यरत आहेत, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा (PNB) समावेश आहे. या बँका आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत आहेत.

Punjab National Bank Investment: भारतात केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली एकूण १२ सरकारी बँका कार्यरत आहेत, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा (PNB) समावेश आहे. या बँका आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) आकर्षक व्याजदर देत आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली, ज्याचा परिणाम म्हणून अनेक बँकांनी आपल्या एफडी व्याजदरात बदल केलेत. याच पार्श्वभूमीवर पीएनबीनंदेखील अलीकडेच व्याजदरात सुधारणा केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. बँक सध्या ग्राहकांना ३.०० टक्के ते ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. बँकेकडून सर्वाधिक व्याजदर ३९० दिवसांच्या विशेष योजनेवर दिला जात आहे. या योजनेचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.

सामान्य नागरिकांना या योजनेत ६.४० टक्के व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत ७.२० टक्के व्याजदर दिला जातोय.

तसंच, ३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.१० टक्के दिला जातोय. तर ज्येष्ठ नागरिकांना ६.६० टक्के व्याज दिलं जात आहे.

जर एखादा सामान्य नागरिक पंजाब नॅशनल बँकेत ६० महिने (५ वर्षे) कालावधीसाठी २ लाख रुपये गुंतवतो, तर त्याला ६.१०% व्याजदराने मॅच्युरिटीनंतर एकूण २,७०,७०१ रुपये मिळतील. यामध्ये ७०,७०१ रुपये हे केवळ व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न असेल.

ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळत आहे. जर एका ज्येष्ठ नागरिकानं ६० महिन्यांच्या कालावधीसाठी २ लाख रुपयांची एफडी केली, तर त्याला ६.६०% व्याजदरानं मॅच्युरिटीनंतर एकूण २,७७,४४५ रुपये मिळतील. यामध्ये ७७,४४५ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.

















