Central Bank of India मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८०,१८८ चं फिक्स व्याज, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:45 IST2026-03-06T09:34:58+5:302026-03-06T09:45:21+5:30
Central Bank Of India Investment: जर तुम्ही अशा गुंतवणुकीच्या शोधात असाल जिथे जोखीम कमी आणि परतावा निश्चित असेल, तर एफडी आजही लोकांची पहिली पसंती आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम.

Central Bank Of India Investment: जर तुम्ही अशा गुंतवणुकीच्या शोधात असाल जिथे जोखीम कमी आणि परतावा निश्चित असेल, तर एफडी आजही लोकांची पहिली पसंती आहे. विशेषतः सरकारी बँकांमधील एफडी सुरक्षित मानली जाते.

याच पार्श्वभूमीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून समोर आली आहे. या बँकेच्या एफडीमध्ये तुम्ही २,००,००० रुपये जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला ८०,१८८ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळू शकतं.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजना ऑफर करते. येथे तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंत एफडी खाते उघडू शकता.

बँक या एफडी खात्यांवर कालावधीनुसार सुमारे ३.००% ते ६.८०% पर्यंत व्याज देत आहे. सरकारी बँक असल्यामुळे यात गुंतवणूक करणं अत्यंत सुरक्षित मानलं जातं, म्हणूनच अनेक लोक आपली बचत एफडीमध्ये ठेवणं पसंत करतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया काही ठराविक कालावधीसाठी विशेष एफडी योजना देखील राबवत आहे. बँकेच्या ४४४ दिवस आणि ५५५ दिवसांच्या विशेष एफडी योजनेत सामान्य नागरिकांना सुमारे ६.३०% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.८०% पर्यंत व्याज मिळू शकतं. याशिवाय, बँक ३ वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना सुमारे ६.००% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.५०% पर्यंत व्याज ऑफर करत आहे.

जर एखाद्या सामान्य नागरिकानं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये २,००,००० रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीवर त्याला सुमारे २,७३,३८० रुपये मिळू शकतात. यामध्ये ७३,३८० रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.

दुसरीकडे, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने याच कालावधीसाठी २,००,००० रुपयांची एफडी केली, तर त्याला मॅच्युरिटीवर सुमारे २,८०,१८८ रुपये मिळू शकतात. म्हणजेच या गुंतवणुकीवर सुमारे ८०,१८८ रुपयांचं निश्चित व्याज मिळतं.

एफडी सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये तुमची मूळ रक्कम सुरक्षित राहते आणि तुम्हाला आधीच ठरवलेले व्याज मिळते. महत्त्वाचं म्हणजे, मॅच्युरिटीवर तुम्हाला मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही गॅरंटीसह परत मिळतात.

















