Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 09:47 IST2026-02-27T08:41:35+5:302026-02-27T09:47:58+5:30
Canara Bank FD Schemes:: पाहा कोणती आहे ही स्कीम, ही सरकारी बँक असल्यानं यात जमा रकमेवर निश्चित परतावा दिला जातो.

Canara Bank FD Schemes: कॅनरा बँक ही एक सरकारी बँक असून ती आपल्या ग्राहकांना एफडी खात्यांवर आकर्षक व्याज ऑफर करत आहे. कॅनरा बँकेत किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं.

ही सरकारी बँक एफडी खात्यांवर ३.०० टक्के ते ७.१० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. येथे आपण कॅनरा बँकेच्या अशा एका एफडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये केवळ २ लाख रुपये जमा करून ७९,५०० रुपयांचं निश्चित व्याज मिळवता येतं.

कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना ५५५ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. ही बँक ५५५ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के आणि सुपर सीनियर सिटीझन (८० वर्षांवरील) व्यक्तींना ७.१० टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक ५ वर्षांच्या कालावधीच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.७५ टक्के इतकं जबरदस्त व्याज देत आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, केनरा बँक केवळ ४४४ दिवस आणि ५५५ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवरच अतिज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देत आहे.

जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि कॅनरा बँकेत २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,७२,७०८ रुपये मिळतील. ज्यामध्ये ७२,७०८ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, म्हणजेच तुमचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही कॅनरा बँकेत २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,७९,५०० रुपये मिळतील, ज्यामध्ये ७९,५०० रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची मोठी कपात केली होती. आरबीआयकडून रेपो रेट कमी केल्यामुळे जिथे होम लोन, कार लोनसह सर्व कर्ज स्वस्त झाले, तर दुसरीकडे एफडीवर मिळणारा परतावा देखील कमी झाला. रेपो रेट कमी केल्यामुळे सर्व बँकांनी एफडीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरातही कपात केली होती.

















