Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:02 IST2025-08-08T08:48:35+5:302025-08-08T09:02:47+5:30

Trump Tariff On India: अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारा एकूण कर ५० टक्क्यांवर गेला आहे. या टॅरिफ वॉरमुळे जगाचे प्राधान्यक्रम हळूहळू बदलत आहेत.

Trump Tariff On India: अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारा एकूण कर ५० टक्क्यांवर गेला आहे. या टॅरिफ वॉरमुळे जगाचे प्राधान्यक्रम हळूहळू बदलत आहेत. सध्या त्याचा परिणाम संघर्षासारखा दिसत असला तरी दीर्घकाळात त्याचे चांगले परिणामही होऊ शकतात. जगभरात सुरू असलेलं टॅरिफ वॉर ही भारतासाठी मोठी संधी असल्याचे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी म्हटलं आहे.

अनेकजण या टॅरिफच्या संकटाला '१९९१ सारखी संधी' म्हणत आहेत. तसंच भारताला परकीय चलन, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून भारत या संधीचा फायदा घेऊन स्वत:ला स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेऊ शकेल.

आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचे सीआयओ महेश पाटील म्हणतात की, यामुळे प्रभावित निर्यात उत्पादनांमध्ये, विशेषत: कमी मार्जिनच्या उत्पादनांमध्ये (कापड, रत्नं आणि दागिने) मोठी घट होईल. "आपल्या आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपीमध्ये २० बेसिस पॉईंट्सच्या घसरणीचा अंदाज अधिक होऊ शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावतंत्राला भारत सरकार कसं प्रत्युत्तर देईल, हा कळीचा प्रश्न आहे. निर्यातदारांना आधार देणं हे पहिलं प्राधान्य आहे," असंही ते म्हणाले.

कधीकधी आपल्याला आश्चर्यचकित करणारे निर्णय किंवा निकाल भविष्यात सर्वात मोठा बदल घडवून आणू शकतात. भारतानं ही संधी ओळखली पाहिजे आणि तिचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे, जेणेकरून देश मजबूत, स्वावलंबी आणि चांगल्या भविष्याकडे वाटचाल करू शकेल, अशी प्रतिक्रिया महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिली.

भारत आता अधिक दृढनिश्चय, व्यापाराची पर्यायी धोरणं आणि मजबूत स्वावलंबनानं प्रतिसाद देईल. तुमचं शुल्क वाढवा, आम्ही आमचा दृढनिश्चय वाढवू, चांगले पर्याय शोधू आणि स्वावलंबी बनू, अशी प्रतिक्रिया आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी दिली.

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया म्हणाले की, भारताची स्वावलंबनाची कहाणी तेव्हा सुरू होते जेव्हा आव्हानं आपल्याभोवती असतात. त्यानंतर बदल सुरू होतात आणि भारत पुन्हा इतिहास घडवतो. अमेरिकेचा हा दृष्टिकोन कठोर वाटू शकतो, परंतु तो एक छुपा आशीर्वाद असू शकतो.

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया म्हणाले की, भारताची स्वावलंबनाची कहाणी तेव्हा सुरू होते जेव्हा आव्हानं आपल्याभोवती असतात. त्यानंतर बदल सुरू होतात आणि भारत पुन्हा इतिहास घडवतो. अमेरिकेचा हा दृष्टिकोन कठोर वाटू शकतो, परंतु तो एक छुपा आशीर्वाद असू शकतो.