GST रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार? 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:01 IST2022-03-21T13:41:55+5:302022-03-21T14:01:29+5:30
GST rate structure : रिपोर्ट आणि राज्याच्या महसूल स्थितीवर विचार करण्यासाठी GST काउन्सिल (GST Council) पुढील महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेऊ शकते.

नवी दिल्ली : जीएसटी रेट स्ट्रक्चरमध्ये (GST rate structure) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदल सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्यमंत्र्यांची समिती 12 टक्के आणि 18 टक्के स्लॅब (Tax slab) एकत्र करून 15 टक्के स्लॅब तयार करण्याची सूचना देऊ शकते, अशी शक्यता आहे.
म्हणजेच पुन्हा 12 आणि 18 टक्के स्लॅब काढून त्यांच्या जागी 15 टक्क्यांचा स्लॅब येईल. मात्र महागाईच्या (Inflation) चिंतेमुळे किमान 5 टक्के ते 8 टक्के दर वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत पॅनेल सावध आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात या गोष्टी समोर आल्या आहेत.
GST काउन्सिलने ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची (GoM) स्थापना केली होती, जी GST रेट्सचे सरलीकरण, वर्गीकरणाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि GST महसूल वाढवण्यासाठी आपल्या सूचना देईल.
जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या शिफारशींवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
पुढील आठवड्यात बैठक होऊ शकते...
सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, या GoM ची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये रेट्सबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आणि शिफारसी केल्या जातील.
रिपोर्ट आणि राज्याच्या महसूल स्थितीवर विचार करण्यासाठी GST काउन्सिल (GST Council) पुढील महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेऊ शकते.
आता काय आहे जीएसटी रेट स्ट्रक्चर?
जीएसटीमध्ये सध्या 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के रेट्ससह 4-स्तरीय स्ट्रक्चर आहे. तसेच, महागड्या धातूंसारख्या काही वस्तूंसाठी विशेष रेट्स आहेत. या सर्व प्रकारामुळे ही व्यवस्था गुंतागुंतीची झाली आहे. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाला तेव्हा महसूल न्यूट्रल रेट जवळपास 15.5 टक्के होता.
महसूल न्यूट्रल रेट म्हणजे जीएसटी लागू करताना राज्यांना किंवा केंद्राचे कोणतेही नुकसान होणार नाही असा रेट आहे. मात्र, अनेक वस्तूंवरील सूट आणि रेट कमी केल्यामुळे ते 11.6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.