SBI, HDFC की बँक ऑफ बडोदा? कोणत्या बँकेचे कार लोन परवडेल? 'हा' आहे १० लाखांचा EMI प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:40 IST2026-02-20T10:22:44+5:302026-02-20T10:40:20+5:30

Cheapest Car Loan : तुम्ही १० लाख रुपयांच्या कार लोनचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेत तुमचा हप्ता कमी बसेल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

१० लाखांच्या कर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकांच्या व्याजदरात तुलना करणे फायदेशीर ठरते.

कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यांचा सिबिल स्कोर ८०० पेक्षा जास्त आहे, त्यांना बँका सर्वात कमी व्याजदराने कर्ज देण्यात प्राधान्य देतात.

कर्जाची मंजुरी केवळ सिबिलवर अवलंबून नसते, तर तुमचे वय, मासिक उत्पन्न आणि सध्या सुरू असलेले इतर कर्ज यांचाही बँक विचार करते.

जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल, तर बँक तुम्हाला कर्ज नाकारू शकते किंवा जास्त व्याजदराने कर्ज देऊ शकते.

स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या नवीन कारसाठी ८.९०% या सुरुवातीच्या व्याजदराने ऑटो लोन ऑफर करत आहे.

खाजगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी सध्या ९% या सुरुवातीच्या व्याजदराने कार लोन उपलब्ध करून देत आहे.

बँक ऑफ बडोदा सध्या सर्वात कमी म्हणजेच ८.५०% (फिक्स्ड रेट) दराने कार लोन देत आहे.

जर तुम्ही एसबीआयकडून १० लाखांचे कर्ज ५ वर्षांसाठी घेतले, तर तुमचा मासिक हप्ता २०,७१० रुपये बसेल आणि एकूण व्याज २,४२,५९१ रुपये भरावे लागेल.

एचडीएफसी बँकेतून याच रकमेसाठी तुमचा हप्ता २०,७५८ रुपये असेल आणि ५ वर्षांत तुम्हाला २,४५,५०१ रुपये व्याज द्यावे लागेल.

बँक ऑफ बडोदामध्ये सर्वात कमी २०,५१७ रुपये हप्ता बसेल. येथे ५ वर्षात तुम्हाला २,३०,९९२ रुपये व्याज भरावे लागेल, जे इतर दोन बँकांच्या तुलनेत कमी आहे.