शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा; १ जानेवारीपासून वाढीव एटीएम शुल्क मोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 8:34 AM

1 / 6
नवीन वर्ष अनेक बदल घेऊन येणार आहे. त्यात बँकांच्या एटीएममधून रक्कम काढण्याच्या शुल्कावर वाढ करण्याच्या महत्त्वाच्या बदलाचा समावेश आहे. एटीएम सेवा शुल्कात एक रुपयाची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.
2 / 6
ग्राहक ज्या बँकेचा ग्राहक आहे त्याला त्याच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा रोख रक्कम काढण्याची मुभा आहे. अन्य बँकांच्या एटीएममधून तीनदा रोख रक्कम काढता येते. परंतु त्यापुढील विथड्रॉवलसाठी शुल्क आकारणी केली जाते.
3 / 6
सध्या ही शुल्क आकारणी प्रत्येक व्यवहारावर २० रुपये अशी आहे. मात्र, १ जानेवारी २०२२ पासून त्यात एक रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. म्हणजे विनाशुल्क विथड्रॉवलची मर्यादा ओलांडली की प्रत्येक विथड्रॉवलवर २१ रुपये ग्राहकांना मोजावे लागतील.
4 / 6
बँकांना विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या एटीएमची देखभाल करावी लागते.- या देखभालीवर खर्च येतो, तसेच एटीएममध्ये पुरेशी रक्कम भरण्यासाठीही वाहतुकीचा खर्च येतो.
5 / 6
बँकांना झालेला हा खर्च वसूल व्हावा यासाठी एटीएम व्यवहारांवर शुल्क आकारणी करण्याची मागणी सातत्याने होत होती. २०१४ पासून शुल्कात वाढ झाली नव्हती.
6 / 6
यंदा ऑगस्ट महिन्यात ही शुल्क आकारणी २० रुपये करण्यात आली. आता त्यात आणखी एक रुपयाची भर पडणार आहे. देशभरात किती एटीएम आहेत? देशभरात एकूण २,१३,१४५ एटीएम आहेत.
टॅग्स :atmएटीएमMONEYपैसा