'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल मोठी कमाई! जाणून घ्या सविस्तर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:01 IST2022-03-24T14:49:45+5:302022-03-24T16:01:28+5:30
Business Idea : हा एक सदाबहार व्यवसाय आहे, जो फक्त 10,000 रुपये गुंतवून सुरू केला जाऊ शकतो आणि दरमहा लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.

नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला आहे. अशा स्थितीत, तुम्ही अनेक व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे लोकांना उन्हाळ्यात थंडावा तर मिळेलच, शिवाय तुम्हाला दरमहा मोठी कमाईही होईल.
विशेष म्हणजे यात नुकसान होण्याचा धोका नाही. हा एक सदाबहार व्यवसाय आहे, जो फक्त 10,000 रुपये गुंतवून सुरू केला जाऊ शकतो आणि दरमहा लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.
दरम्यान, हा व्यवसाय आईस्क्रीम पार्लरचा (Ice Cream) आहे. देशात आईस्क्रीमप्रेमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. उन्हाळ्याव्यतिरिक्त हिवाळ्यातही लोकांना आईस्क्रीम खायला आवडते.
अशी करू शकता सुरूवात
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक फ्रीझर असला पाहिजे. तुम्ही घरी किंवा कुठेतरी दुकान भाड्याने घेऊन आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता. 400 ते 500 चौरस फूट कार्पेट एरियाची कोणतीही जागा आईस्क्रीम पार्लर उघडण्यासाठी पुरेशी आहे. यात 10 लोक बसण्याची व्यवस्था करू शकता.
घेऊ शकता फ्रेंचायझी
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही अमूल आईस्क्रीम पार्लरची फ्रेंचायझी देखील घेऊ शकता. त्यासाठी किमान 300 चौरस फूट जागा आवश्यक आहे. तुमच्याकडे पुरेशी जागा असल्यास, तुम्ही फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी retail@amul.coop वर ईमेल करू शकता. http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकता.
FSSAI कडून लायसन्स आवश्यक
आईस्क्रीम व्यवसाय सुरू करण्यासाठी ट्रेड बॉडी FSSAI कडून लायसन्स घेणे आवश्यक आहे. हा एक 15 डिजिटचा एक रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो येथे तयार केलेले खाद्यपदार्थ FSSAI च्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करतो. 2022 पर्यंत देशातील आइस्क्रीमचा व्यवसाय एक अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असे एका अहवालात म्हटले आहे.