BSNL Top Offer : जबरदस्त ऑफर, ५९९ रूपयांचा प्लॅन २७५ रूपयांत; ७५ दिवस व्हॅलिडिटी, ३३०० जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:30 PM2022-08-12T12:30:51+5:302022-08-12T12:35:17+5:30

BSNL Top Offer : कंपनीनकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त जबरदस्त ऑफर आणण्यात आली आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना सामान्य टॅरिफपेक्षा कमी खर्चात 75 दिवसांची ब्रॉडबँड सेवा मिळणारआहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार बीएसएनएलची ही ऑफर 275 रूपयांमध्ये 75 दिवसांसाठी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देत आहे. कंपनीची इंडिपेंडंस डे 2022 ऑफर 449 रुपये, 599 रूपये आणि 999 रूपयांच्या प्लॅनवर उपलब्ध आहे. पाहूया याचे डिटेल्स.

ऑफर अंतर्गत, कंपनी 499 रुपये आणि 599 रूपयांचा प्लॅन 275 रूपयांमध्ये घेण्याची संधी देत आहे. 75 दिवसांनंतर, तुम्हाला या प्लॅनसाठी रेग्युलर टॅरिफ द्यावं लागणार आहे. जर आपल्याला 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर ऑफर अंतर्गत ते 775 रुपयांमध्ये घेता येणार आहे.विशेष म्हणजे डिस्काउंटनंतरही कंपनीने या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

कंपनी आपल्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30Mbps इंटरनेट स्पीड देत आहे. तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 3300GB (3.3TB) डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी होईल. त्याचप्रमाणे, कंपनी आपल्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 60Mbps स्पीड ऑफर करत असून 3.3TB डेटा देत आहे.

999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps च्या स्पीडने 2TB डेटा मिळेल. Disney + Hotstar आणि Sony Liv व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमधील इतर अनेक लोकप्रिय OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. कंपनीची ही जबरदस्त ऑफर नवीन युझर्ससाठी आहे.

BSNL ने नुकताच आपला 2022 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीचा हा प्लॅन 300 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला इंटरनेट वापरासाठी 75 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा पहिल्या 60 दिवसांसाठी वापरला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. हा प्लॅन 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल.