₹38 वरून कोसळून ₹2 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; 6 महिन्यांपासून करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:08 PM2023-12-17T19:08:26+5:302023-12-17T19:17:58+5:30

गेल्या सहा महिन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरने 344.44% चा जबरदस्त परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील ब्लू-चिप इंडिया या छोट्या कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना सध्या मालामाल करताना दिसत आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी एनएसईवर 3% पर्यंत वधारला आणि 2 रुपयांच्या उच्चांकावर बंद झाला.

याच प्रमाणे, बीएसईवरही हा शेअर 1.41% ने वधारत 1.44 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 12% आणि एका महिन्यात 53.85% ने वधारला आहे.

गेल्या सहा महिन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरने 344.44% चा जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत याची किंमत 45 पैशांनी वाढून 2 रुपयांवर पोहोचली आहे. एवढेच नाही, तर या वर्षात YTD मध्ये ब्लू-चिप स्टॉकने 567% चा परतावा दिला आहे. जानेवारी म्हन्यात या शेअरची किंमत केवळ 30 पैसे एवढी होती.

कधीकाळी 38 रुपयांवर होता हा शेअर - 1 ऑक्टोबर 2003 रोजी या शेअरची किंमत 38 रुपये एवढी होती. आताचा विचार करता, हा शेअर तब्बल 94% पर्यंत घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 7.96 कोटी रुपये एवढे आहे.

कंपनीने नुकतेच शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ब्लू-चिप इंडियाच्या डायरेक्टर सुरुची जैन यांनी व्यैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ब्लू चिप इंडिया ही एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्यान लोन आणि अॅडव्हॉन्स देणे आणि शेअर्स अथवा सिक्योरिटीमध्ये गुंतवणूक करते. ब्लू चिप इंडिया लिमिटेडला 27 जून 1985 रोजी इनकॉर्पोरेट करण्यात आले होते आणि दिल्ली तसेच हरियाणामध्ये कंपनी रजिस्ट्रारसह रजिस्टर्ड करण्यात आली होती.

सध्या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोलकाता येथे आहे. महत्वाचे म्हणजे, 2000 साली कंपनीने प्रत्येक पाच इक्विटी शेअर्समागे दोन इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात एक बोनस शेअर दिला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)