'या' ५ लोकांकडे आहे जगातील सर्वाधिक संपत्ती; हा अब्जाधीश पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:43 IST2025-03-11T15:40:35+5:302025-03-11T15:43:57+5:30
bloomberg billionaires : आजच्या जगात मूठभर लोकांकडे सर्वाधिक संपत्ती एकवटली आहे. या लोकांची संपत्ती इतकी आहे की अनेक देशांचा जीडीपीही त्यांच्या एकूण संपत्तीपेक्षा कमी आहे.

मुठभर लोकांकडे जगातील निम्म्यांहून अधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. नुकतेच ब्लूमबर्ग संस्थेने जगातील अव्वल नेटवर्थ असलेल्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये जगातील ५ सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स २०२५ च्या १० मार्चच्या अहवालानुसार, जगातील अव्वल नेटवर्थ व्यक्तींच्या यादीत इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहे. इलॉन मस्क हे प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आहेत. टेस्ला, स्पेसएक्स, स्टारलिंक, द बोरिंग ह्या मस्क यांच्या कंपन्या आहेत. मस्क यांच्याकडे ३३० अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
आघाडीची टेक कंपनी मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्क हे अमेरिकन उद्योजक असून सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हॉटअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत. २०१० मध्ये अमेरिकन मासिक टाइम्सने मार्क यांना २०१० साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले. मार्क झुकरबर्गची संपत्ती २२१ अब्ज डॉलर्स आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स २०२५ नुसार, जेफ बेझोस सर्वाधिक संपत्ती असलेल्या लोकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जेफ बेझोस एक व्यापारी, मीडिया प्रोप्रायटर, गुंतवणूकदार आणि अंतराळवीर आहेत. जेफ बेझोस हे Amazon.com चे संस्थापक अध्यक्ष आहेत. २०१८ मध्ये, फोर्ब्सने जेफ बेझोस यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते. जेफ बेझोसची १० मार्च २०२५ पर्यंतची एकूण संपत्ती ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार २२० अब्ज डॉलर्स आहे.
या यादीत अरनॉल्ट बर्नार्ड चौथ्या क्रमांकावर आहे. बर्नार्ड हे फ्रेंच व्यापारी, गुंतवणूकदार आणि कला संग्राहक आहेत. अरनॉल्ट हे लुई व्हिटॉन कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी लक्झरी वस्तू विकणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. अरनॉल्ट यांची कंपनी जगातील सर्वात मोठ्या लक्झरी ब्रँडपैकी एक आहे. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स २०२५ नुसार त्यांच्याकडे १८४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
लॅरी ॲलिसन एक अमेरिकन अब्जाधीश आणि गुंतवणूकदार आहे. ओरॅकल कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीचे ते सह-संस्थापक आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी अॅपेक्स नावाच्या कंपनीत काम केले आणि त्यानंतर १९७७ मध्ये ओरॅकलची स्थापना केली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, लॅरी जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जास्त संपत्ती असलेली व्यक्ती आहे. त्यांच्याकडे १७६ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.