Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:47 IST2025-12-04T14:34:28+5:302025-12-04T14:47:14+5:30
Gold Silver Rate Today on Dec 4: गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीमुळे चांदीचा भाव झटक्यात २४७७ रुपयांनी घसरला, तर सोनेही ४५९ रुपयांनी स्वस्त झाले.

आज सर्राफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीमुळे चांदीचा भाव झटक्यात २४७७ रुपयांनी घसरला, तर सोनेही ४५९ रुपयांनी स्वस्त झाले.

आज चांदी जीएसटी शिवाय १७५७१३ रुपये प्रति किलोने खुली झाली, तर जीएसटीसह हा भाव १८०९८४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा दर जीएसटी वगळता १७८१९० रुपये प्रति किलो होता.

सोन्यामध्येही घसरण दिसून आली असून, आज २४ कॅरेट सोने १२७७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह या सोन्याची किंमत आता १३१५८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेट सोने जीएसटीसह १२०५३४ रुपये आणि १८ कॅरेट सोने ९८६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.

या घसरणीनंतर, सोन्याचा दर १७ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय १३०८७४ रुपयांपेक्षा केवळ ३११९ रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी ३ डिसेंबरच्या १७८६८४ रुपये या सर्वोच्च पातळीपेक्षा २९७१ रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे स्पॉट दर IBJA ने जारी केले आहेत.

महत्वाचे म्हणजे, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोन वेळा, म्हणजेच दुपारी १२ आणि सायंकाळी ५ च्या सुमारास सोन्या-चांदीचा दर जाहीर करते.

कॅरेटनुसार सोन्याचा ताजे दर असे.... - २३ कॅरेट सोने ४५८ रुपयांनी स्वस्त होऊन १२०५३४ रुपये (जीएसटीसह १३१०६० रुपये) प्रति १० ग्रॅमवर आले आहे. तर, २२ कॅरेट सोने ४२० रुपयांनी स्वस्त होऊन ११७०२४ रुपये (जीएसटीसह १२०५३४ रुपये) प्रति १० ग्रॅमवर आले आहे.

१८ कॅरेट सोने ३४५ रुपयांनी स्वस्त होऊन ९५८१६ रुपये (जीएसटीसह ९८६९० रुपये) प्रति १० ग्रॅमवर आले आहे. तर, १४ कॅरेट सोने २६८ रुपयांनी स्वस्त होऊन ७४७३७ रुपये (जीएसटीसह ७६९७९ रुपये) प्रति १० ग्रॅमवर आले आहे. महत्वाचे म्हणजे, वरील दरांमध्ये मेकिंग चार्ज जोडण्यात आलेले नाहीत.




















