घाबरू नका; या मार्गानं होईल सॅलरीपेक्षाही अधिक कमाई, चालून तर पाहा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:40 PM2021-06-08T15:40:55+5:302021-06-08T15:54:31+5:30

Best investment tips : आजच्या काळात आपल्यासाठी जेवढे महत्वाचे कमावणे आहे, त्याहून अधिक महत्वाचे आहे, कमावलेल्या पैशांतून बचत करणे. कमी कमाईत पैसे मागे टाकणे अवघड असले, तरी अशक्य नक्कीच नाही. कारण नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बचतच भविष्यातील जोडीदार असते.

अनेक वेळा आपण सहज बोलतो अथवा ऐकतो, की सध्या आमची सॅलरी फारच कमी आहे. यातून आमचा महिन्याचा खर्चही भागत नाही. तर मग बचत कशी करणार? जेव्हा सॅलरी वाढेल, तेव्हा थोडे बहूत पैसे मागे पडतील आणि त्यातून गुंतवणूक करता येईल. मात्र, कमी गुंतवणुकीतही चांगल्या परताव्याची माहिती नसल्याने लोक असे बोलतात. (Best investment tips for the salaried class employee)

गुंतवणूकीसाठी बचत आवश्यक - आजच्या काळात आपल्यासाठी जेवढे महत्वाचे कमावणे आहे, त्याहून अधिक महत्वाचे आहे, कमावलेल्या पैशांतून बचत करणे. कमी कमाईत पैसे मागे टाकणे अवघड असले, तरी अशक्य नक्कीच नाही. कारण नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बचतच भविष्यातील जोडीदार असते.

कमाईसोबतच गुंतवणुकीला सुरुवात करा - विशेषतः खासगी क्षेत्रातील लोक जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू करतील, आर्थिक दृष्ट्या त्यांचे भविष्य तेवढेच चांगले होईल. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत, नोकरी करणारे लोक कशा प्रकारे चांगले गुंतवणूकदार बनू शकतात आणि पगारापेक्षाही गुंतवणुकीतून कशा प्रकारे कमाई होऊ शकते.

सातत्याने गुंतवणुकीची आवश्यकता - आपली सॅलरी जेवढी असेल, त्यातूनच आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. यावेळी केवळ खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

नौकरी करणाऱ्या लोकांची सॅलरी हळू-हळू वाढत जाते. कमाई वाढतानाच गुंतवणूकही वाढत गेल्यास काही काळानंतर त्याच छोट्या गुंतवणुकीचे रुपांतर मोठ्या फंडात होईल.

कसा वाचवावा पैसा - उदाहरणच द्यायचे, तर गृहित धरा, की एखाद्याची सॅलरी 25 हजार रुपये आहे. त्याला दर महिन्याला 10-12 हजार रुपयांची बचत करणे अवघड आहे. मात्र, दर महिन्याला खर्चात थोडी बचत करून संबंधित व्यक्ती 10 टक्के पैशांची नक्कीच बचत करू शकतो. म्हणजेच दर महिन्याला 2500 रुपयांपर्यंतची बचत शक्य आहे. आता या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

म्यूच्युअल फंडात करा गुंतवणूक - दर महिन्याला म्यूच्युअल फंडात SIPच्या माध्यमाने 2500 रुपये टाकल्यास 5 वर्षांनंतर 15 टक्के परताव्यासह ही रक्कम जवळपास 2 लाख रुपये होईल. यादरम्यान दरवर्षी गुंतवणूकदाराची सॅलरीही वाढत राहील. असे केल्यास पाच वर्षांनंतर गुंतवणूकदाराकडे एकगठ्ठा 2 लाख रुपये असतील. जर याच प्रकारे पुढील 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास 8 वर्षांनंतर एकूण रक्कम वाढून 4 लाख रुपये होईल.

कमाई बरोबरच गुंतवणूकही वाढवायला हवी - नोकरी करणाऱ्या लोकांची सॅलरी साधारणपणे 8 वर्षांत डबल होते. वर्षाला 10 टक्के वेतनवाढ झाली, तरी सुरुवातीला 25 हजार रुपये वेतन असणाऱ्यांचे वेतन 10 वर्षांनंतर 50 हजार रुपयांच्याही वर जाईल. तर केवळ अडीच हजार रुपयांनी सुरू केलेल्या गुंतवणुकीतून या कालावधीत 6 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका - एवढेच नाही, तर या 10 वर्षांच्या काळात गुंतवणूकदार वाढलेल्या सॅलरीतून बचत केलेले पैसे दुसऱ्या ठिकाणीही गुंतवू शकतात. जसे शेअर बाजार, PPF आणि शॉर्ट टर्म फंड.

याशिवाय, गुंतवणूकदार याच वेगाने 20 वर्षांपर्यंत म्यूच्यूअल फंडसह इतर ठिकाणी गुंतवणूक करत राहिला, तर त्यांना गुंतवणुकीतूनच वेतनापेक्षा अधिक कमाई होईल. मात्र, कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि आर्थिक सल्लागाराची मदद नक्की घ्या.

Read in English