FD गुंतवणूकदारांची चांदी! मुथूट, श्रीरामसह 'या' बँका देतायत जबरदस्त व्याज; पाहा टॉप ५ बँकांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:42 IST2026-03-03T11:29:26+5:302026-03-03T11:42:11+5:30
Fixed Deposits : सध्याच्या काळात सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी 'फिक्स्ड डिपॉझिट' हा एक उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही नवीन एफडी करण्याचा विचार करत असाल, तर काही बँका आणि एनबीएफसी सध्या ९% पेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहेत.

गुंतवणूकदारांसाठी सध्या मुथूट कॅपिटल हा सर्वात आकर्षक पर्याय ठरत आहे. ३६ महिन्यांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ९.१०% तर ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ९.३५% व्याज मिळत आहे.

या बँकेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. इथे सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही श्रेणीतील गुंतवणूकदारांना ७.९०% दराने व्याज दिले जात आहे.

उत्तम परतावा शोधणाऱ्यांसाठी स्लाइस स्मॉल फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे. ही संस्था सध्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी ७.७५% व्याजदर ऑफर करत आहे.

श्रीराम फायनान्स येथे सामान्य ग्राहकांना ७.६०% व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ८.१०% इतका आहे. सुरक्षित आणि स्थिर परताव्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

शिवालिक स्मॉल फायनान्स या बँकेत सामान्य ग्राहकांना ७.५५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.०५% व्याजदर दिला जात आहे. एफडीसाठी हा देखील एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो.

बजाज फायनान्स ही एक नामांकित एनबीएफसी संस्था असून येथे सामान्य ग्राहकांना ६.९५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% दराने व्याज मिळत आहे.

तुम्ही तुमची एफडी बँका किंवा मुथूट, श्रीराम आणि बजाज यांसारख्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये करू शकता. अनेकदा बँकांपेक्षा एनबीएफसी अधिक व्याज ऑफर करतात.

जास्त व्याजदरासोबतच त्या संस्थेची विश्वासार्हता आणि कालावधी तपासणे महत्त्वाचे आहे. ९.३५% पर्यंत व्याज मिळवून तुम्ही तुमच्या बचतीवर मोठी वाढ मिळवू शकता.

















