KYC अपडेट केलं नाही, तुमचं बँक अकाउंट होणार सस्पेंड? काळजी करू नका, असं होईल रिॲक्टिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 13:39 IST
1 / 6नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने निर्धारित कालावधीत केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे बँक अकाउंट निष्क्रिय म्हणजेच सस्पेंड केले जाईल. केवायसी अपडेट न केल्यामुळे, तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. तसेच, तुम्हाला या बँक अकाउंटमधील रिफंड सुद्धा मिळू शकणार नाही.2 / 6दरम्यान, प्रत्येक कॅटगरीतील ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया वेग-वेगळी असते. उदाहरणार्थ, उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी केवायसी, मध्यम जोखमीच्या ग्राहकांना दर 8 वर्षांनी आणि कमी जोखमीच्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी करावी लागते.3 / 6भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 मे 2023 रोजी 29 मे 2019 रोजी जारी केलेले परिपत्रक अपडेट केले आहे. यामध्ये म्हटले की, जर एखाद्या ग्राहकाने आपला पॅन किंवा फॉर्म 16 दिला नाही तर त्याचे बँक अकाउंट सस्पेंड केले जाईल. मात्र, अकाउंट बंद करण्यापूर्वी बँकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे त्याची माहिती द्यावी लागेल.4 / 6केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. दरम्यान, तुम्ही ते सक्रिय म्हणजेच रिअॅक्टिव्ह करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, अकाउंट रिॲक्टिव्ह करण्याची प्रक्रिया सर्व बँकांमध्ये सारखीच आहे. 5 / 6तुमचे अकाउंट सस्पेंड केले असल्यास, तुम्ही तुमचे अकाउंट तीन पद्धतीने रिॲक्टिव्ह करू शकता. तुम्हाला या तीनपैकी कोणत्याही एका मार्गाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.6 / 6बँक ऑफ बडोदाच्या मते, तुम्ही केवायसी कागदपत्रांसह तुमच्या बँक अकाउंटच्या शाखेला भेट देऊन आणि पुन्हा केवायसी फॉर्म घेऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता. याशिवाय व्हिडिओ कॉलद्वारेही हे काम करता येणार आहे. तसेच, तुम्ही पत्त्यासह बँकेत फॉर्म भरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.