SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा

By जयदीप दाभोळकर | Published: August 7, 2021 12:51 PM2021-08-07T12:51:50+5:302021-08-07T13:00:10+5:30

e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार.

२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते e RUPI हे व्हाऊचर लाँच करण्यात आलं होतं. कॅशलेस आणि संपर्क रहित रकमेचा भरणा करण्यासाठी e RUPI लाँच करण्यात आलं.

e RUPI मूळत: एक प्रकारचं डिजिटल व्हाऊचर आहे, जे लाभार्थींना त्यांच्या फोवर एसएमएस किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून मिळते.

हे एक प्रकारचं प्रीपेड व्हाऊचर आहे, जे लाभार्थी कोणत्याही केंद्रावर, जे e RUPI स्वीकारतात अशा ठिकाणी जाऊन त्याचा वापर करू शकतात.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं e RUPI साठी ११ बँकांशी करार केला आहे. यामध्ये अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.

याशिवाय इंडियन बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकांचाही समावेश करण्यात आला आहे.

याचा स्वीकार करणाऱ्या अॅप्समध्ये भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लॅब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनी एसबीआय मर्चंट पे यांचा समावेश आहे. यामध्ये लवकर e RUPI स्वीकारणाऱ्या आणि अधिक बँकांच्या अॅप्सचा समावेश होणार आहे.

e RUPI साठी लाभार्थींकडे बँक खातं असणं आवश्यक नाही, सुरक्षेच्या दृष्टीनं यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ययामध्ये वैयक्तिक माहिती देण्याचीही गरज भासत नाही.

e-RUPI हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NCPI नं विकसित केलं आहे. e-RUPI हे एक प्रकारचं कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस साधन आहे. हे एक QR कोड अथवा SMS स्ट्रिंग बेस्ड ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींना मोबाईलवर पाठवलं जातं.

हे सर्व्हिस प्रोव्हायडरला कोणत्याही मध्यस्थीशिवाय आणि कोणत्याही भागीदारीच्या वेळी पेमेंट करेल. e-RUPI एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल सेवा आहे. सेवा देणाऱ्यांना आणि लाभार्थींना डिजिटलीच पैसे पाठवण्याची सुविधा याद्वारे मिळते.

यामध्ये निरनिराळ्या योजनांची लिंकप्रुफ डिलिव्हरीही करता येते. तसंच हे एक क्युआर कोड एसएमएस स्ट्रिंग आधारीत ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींच्या मोबाईलवर पोहोचवता येतं. याद्वारे वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग अॅक्सेसशिवाय व्हाऊद्वारे पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

e-RUPI कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांसह सेवांच्या प्रायोजकांना जोडते. e-RUPI कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांसह सेवांच्या प्रायोजकांना जोडते.

नियमित पैशांच्या देवाणघेवाणीशिलाय याचा वापर आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, सब्सिडीसारख्या योजना, मातृत्व आणि बालकल्याण योजना, औषधं आणि रुग्णांचा तपास आदी सेवांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.

या व्हाऊचरचा उपयोद खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याद्वारे कल्याण आणि कॉर्पोरेट जबाबदारीशी निगडीत कामकाजांमध्येही केला जाऊ शकतो.

Read in English