जबरदस्त फॉर्म्युला...! केवळ 21 वर्षांतच मुलगा होईल करोडपती; करावं लागेल केवळ हे एक काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:24 PM2023-11-07T13:24:09+5:302023-11-07T13:31:35+5:30

जर आपणही आपल्या मुलाचे भविष्य आर्थिक दृष्ट्या बळकट करण्याचा विचार करत असाल, तर...

अनेक लोक कमावलेल्या पैशांची सेव्हिंग करून ते अशा ठिकाणी गुंतवायचा विचार करत असतात, जेथे त्यांचा पैसा सुरक्षितही राहील आणि चांगला परतावाही मिळेल. याशिवाय, काही लोक त्यांच्या वृद्धापकाळासाठी पैसा जमवत असतात. तर काही लोक त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी फंड तयार करण्याच्या प्रयत्नात असतात.

जर आपणही आपल्या मुलाचे भविष्य आर्थिक दृष्ट्या बळकट करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. आपण त्याला 21 व्या वर्षिच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIPच्या माध्यमाने कोट्यधीश होण्याचे गिफ्ट देऊ शकता.

आपल्या पाल्याकरता मोठा निधी जमवण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. याच्या परताव्याचा इतिहास बघता, यात आज केलेली गुंतवणूक आपल्या पाल्याला वयाच्या 21 व्या वर्षी कोट्यधीश बनवू शकते, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. मात्र, यासाठी गुंतवणूकीचा एक खास फॉर्म्युला आहे. यानुसार आपल्याला दर महिन्याला बचत आणि गुंतवणूक करावी लागेल.

लाँगटर्मसाठी अत्यंत फायदेशीर ठरते SIP - मुलांसाठी जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू केली, तेवढी फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, आज एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

यात मिळालेल्या रिटर्न्सवर एक नजर टाकली, तर अनेक एसआयपीचे रिटर्न्स 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. तसेच, यातील सरासरी परताव्याचा दर 12 ते 16 टक्क्यांपर्यंत आहे. एवढा परतावा मिळाला, तरी तुमच्या ठरावीक रकमेची गिंतवणूक कोटीपर्यंत पोहोचू शकते.

असा आहे फॉर्म्युला - जर आपण मुलाचा जन्म होताच, दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी करायला सुरुवात केली आणि ती 21 वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर या कालावधीत आपणम गुंतवलेली एकूण रक्कम रु. 25,20,000 एवढी होईल.

यावर आपल्याला 16 टक्के परतावा मिळाला, तरी आपल्याला मिळणारा परतावा तब्बल 1,81,19,345 रुपये एवढा असेल. यापद्धतीने 21 वर्षांत आपला एकूण फंड 2,06,39,345 रुपये एवढा होईल.

या कालावधीत आपल्याला 12 टक्के परतावा मिळाला तरी आपला मुलगा कोट्यधीश बनेल. त्याच्यासाठी हा फंड 1,13,86,742 रुपये एवढा होईल.

(टीप - येथे केवळ म्युच्युअल फंडसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)