भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये मोबाईल डेटा स्वस्त; 'या' देशात इंटरनेटचा सर्वाधिक 'भाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 05:39 PM2024-02-18T17:39:22+5:302024-02-18T17:48:50+5:30

Average cost of 1GB of mobile data: मोबाईल डेटा सर्वात स्वस्त असलेल्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात मोबाईलपासून जर कोणी दूर असेल तर तो अपवादच... मोबाईल वापरण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. डेटानुसार इंटरनेटचे मूल्य ठरवले जाते. मोबाईल डेटा सर्वात स्वस्त असलेल्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

पण, जगातील तीन देशांमध्ये भारताच्या तुलनेत मोबाईल डेटा अधिक स्वस्त आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. Cable.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एक जीबी मोबाईल डेटाची किंमत सुमारे १३.२८ रुपये आहे.

खरं तर शेजारी पाकिस्तानमध्ये ९.९६ रुपयांमध्ये एक जीबी मोबाईल डेटा मिळतो. जर आपण जगातील सर्वात स्वस्त डेटाबद्दल भाष्य केले तर, इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त मोबाईल डेटा मिळतो. तिथे ग्राहकांना एक जीबी मोबाइल डेटासाठी फक्त १.६६ रुपये खर्च करावे लागतात.

एकूणच भारतात मिळणाऱ्या प्रत्येक एक जीबी मोबाईल डेटामागे इस्रायलमध्ये आठ जीबी डेटा मिळतो.

पाकिस्तान आणि इस्रायल व्यतिरिक्त इटलीमध्ये मोबाईल डेटाची किंमतही भारताच्या तुलनेत स्वस्त आहे. इटलीमध्ये एक जीबी डेटाची किंमत ७.४७ रुपये आहे.

सर्वात स्वस्त डेटाच्या बाबतीत भारतानंतर फ्रान्स, बांगलादेश, रशिया, युक्रेन, उरुग्वे, इंडोनेशिया, मलेशिया आणि चीनचा क्रमांक लागतो.

सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देण्याच्या यादीत बांगलादेश सहाव्या क्रमांकावर आहे, तर चीन बाराव्या क्रमांकावर आहे.

अर्जेंटिनाच्या जवळ असलेल्या ब्रिटीश नियंत्रित देश फॉकलंड बेटांमध्ये १ जीबी मोबाईल डेटासाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात. माहितीनुसार, इथे एक जीबी मोबाईल डेटासाठी ३३ रूपये खर्च करावे लागतात.