शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

AI मुळे नोकरीवर गदा? अमेझॉनमधून ३०,००० कर्मचारी बाहेर जाणार; भारतही कपातीच्या सावटाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:08 IST

1 / 7
अमेझॉनच्या कॉर्पोरेट विभागात सुमारे ३.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. खर्चात कपात करण्यासाठी कंपनी यापैकी जवळपास ३०,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे.
2 / 7
नोकरकपातीचा सर्वात जास्त परिणाम अमेझॉन वेब सर्व्हिसेस, रिटेल विभाग, प्राइम व्हिडिओ आणि ह्युमन रिसोर्स यांसारख्या महत्त्वाच्या विभागांवर होण्याची शक्यता आहे.
3 / 7
ही कपात केवळ अमेरिकेतच मर्यादित नसून, भारत आणि जगातील इतर देशांमध्ये असलेल्या अमेझॉनच्या कार्यालयांवरही याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
4 / 7
अमेझॉनने आपले संघटनात्मक स्वरूप अधिक लवचिक बनवण्यासाठी आणि मॅनेजमेंटमधील अनावश्यक पदे कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कंपनीला आपला खर्च कमी करून नफा वाढवायचा आहे.
5 / 7
कंपनी आता पारंपारिक कामांऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे एका बाजूला जुन्या स्वरूपातील नोकऱ्या कमी होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला AI क्षेत्रातील कुशल लोकांची भरती केली जात आहे.
6 / 7
सप्टेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, अमेझॉनमध्ये एकूण १५.७ लाख कर्मचारी काम करत आहेत. यातील मोठा हिस्सा वेअरहाऊस (गोदाम) विभागातील आहे. याआधी २०२३ मध्येही कंपनीने २७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.
7 / 7
केवळ अमेझॉनच नाही, तर संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र सध्या अस्थिरतेच्या काळातून जात आहे. AI मुळे कामाच्या पद्धती बदलत असल्याने अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरीEmployeeकर्मचारीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स