शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गेल्या 21 वर्षांत देशातील 'या' एअरलाईन्स पडल्या बंद; लाखो रोजगार गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:08 AM

1 / 9
आठ हजार कोटी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजच्या प्रशासनाने बुधवारी ही सेवा तात्पुरती बंद करत असल्याची घोषणा केली. जेट एअरवेजला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक व इतर बँकांकडून आर्थिक मदत मिळवण्यात अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात गेल्या 21 वर्षात बऱ्याच भारतीय विमान कंपन्या बंद पडल्या आहेत.
2 / 9
20 जानेवारी 1981 रोजी 'वायुदूत' ही भारतीय विमान कंपनी सुरू झाली होती. मात्र 1987 मध्ये ही कंपनी बंद पडली.
3 / 9
1991 मध्ये सहारा एअरलाईन्स कंपनीच्या विमान सेवेला सुरुवात झाली. 2007 मध्ये ही कंपनी 'जेट एअरवेज'ने विकत घेतली.
4 / 9
ईस्ट- वेस्ट एअरलाईन्स विमान कंपनी खासगी सेवा देत होती. या कंपनीची सुरुवात 1992 मध्ये झाली. 1996 मध्ये या विमान कंपनीचा कारभार ठप्प झाला.
5 / 9
परवेझ दमानिया यांनी 1993 मध्ये दमानिया एअरवेज ही कंपनी सुरू केली होती. मात्र 1997 मध्ये या विमान कंपनीची सेवा बंद झाली.
6 / 9
मोदीलफ्ट ही विमानसेवा कंपनी 1993 मध्ये सुरू झाली होती. अजय सिंह यांनी त्यानंतर ती विकत घेतली आणि 2005 मध्ये त्याचं नाव बदलून ते स्पाइसजेट असं करण्यात आलं.
7 / 9
1993 मध्ये अर्चना एअरवेज ही कंपनी सुरू करण्यात आली होती. मात्र 2000 मध्ये ही कंपनी बंद झाली.
8 / 9
2003 मध्ये एअर डेक्कन या कंपनीची सुरुवात झाली होती. मात्र 2007 मध्ये किंगफिशरने ती विकत घेतली.
9 / 9
विजय माल्ल्या याची 'किंगफिशर' ही विमान कंपनी प्रसिद्ध होती. मात्र कंपनीवर कर्ज असल्यामुळे 2012 मध्ये ही कंपनी बंद झाली.
टॅग्स :airplaneविमानJet Airwaysजेट एअरवेज