AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:37 IST2025-11-07T18:32:03+5:302025-11-07T18:37:40+5:30

AI Share Market: मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य घसरू लागले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारसही सतर्क होऊ लागले आहेत.

AI Stock Market News: अमेरिकेमध्ये लोकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकार समोरील आव्हाने वाढली असून, त्याचा परिणाम इतर देशांवरही होऊ लागला आहे. पण, या संकटाचे सर्वात आधी संकेत शेअर मार्केट देते. अमेरिकेतही तेच होत आहे.

अमेरिकेच्या शेअर बाजारात सध्या गुंतवणुकदारांकडून विक्रीवर जोर दिला जात आहे. गुरुवारी (६ नोव्हेंबर) अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये भूकंप आला. S&P 500 १.१ टक्क्यांनी घसरला. तर Nasdaq इंडेक्सही २ टक्क्यांनी घसरला आहे.

शेअर बाजारातील या घसरणीचे प्रमुख कारणांमध्ये एक आहे एआय शेअर. अशी चर्चा सुरु झाली आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक फुगा होता आणि तो आता फुटू लागला आहे. गुंतवणूकदारांनाही एआय कंपन्यांबद्दल चिंता सतावू लागली आहे.

मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या विशेषतः एआय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे मूल्य घसरू लागले आहे. त्यामुळे हे शेअर भविष्यात परतावा देतील की, नाही याबद्दल गुंतवणूकदार सतर्क होऊ लागले आहेत. कारण मागील दोन वर्षांत एआय क्षेत्रात कंपन्याची गर्दी बघायला मिळाली मात्र त्यांची वाढ अपेक्षाप्रमाणे होताना दिसत नाही.

गुंतवणूदारांना ही भीती आहे की, काही मोठ्या आयटी कंपन्यांनी जी मोठी ग्रोथ दाखवली होती. ती आता आता जुळत नाहीये. दुसरीकडे अमेरिकेत नोकरकपात सुरू आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये १.५३ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यात तंत्रज्ञान, रिटेल, सेवा क्षेत्र, वेअर हाऊसिंग, लॉजिस्टिक्ससह इतरही उद्योगांवर परिणाम झाला आहे.