शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani: अदानी समुहावरील घोटाळा आरोपावर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:51 AM

1 / 9
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केल्या. अधिवेशनातही या संदर्भात आरोप केले, या आरोपावर आज पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2 / 9
अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसने संसदेत केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावर आज अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असल्याने यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
3 / 9
हिंडनबर्गच्या अहवालावरून संपूर्ण देशात राजकीय खळबळ उडाली होती. संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
4 / 9
एका मुलाखतीदरम्यान अमित शाह यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'अदानी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालय याकडे लक्ष देत आहे, त्यामुळे मी मंत्रिपद भूषवताना काहीही बोलणे योग्य नाही, पण भाजपसाठी लपवण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काही नाही, असंही अमित शाह म्हणाले.
5 / 9
हिंडेनबर्ग-अदानी वादात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारवर पक्षपात आणि भांडवलशाहीचा आरोप केला आहे. संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी करत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.
6 / 9
याप्रकरणी विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एलआयसी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अदानी समूहातील गुंतवणुकीवर उत्तर मागितले आहे.
7 / 9
केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सेबीने अदानी समूहाबाबतच्या हिंडनबर्ग अहवालानंतर गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे मान्य केले आहे.
8 / 9
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाला माहिती दिली आहे.
9 / 9
'हिंडेनबर्ग रिसर्चच्या अलीकडील अहवालामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सेबी पूर्णपणे तयार आहे. भविष्यात गुंतवणूकदारांच्या सुरक्षेची खात्री कशी करता येईल यासाठी समिती नेमण्यास सरकारला हरकत नाही, असंही मेहता म्हणाले.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAmit Shahअमित शाहshare marketशेअर बाजार