AC खरेदी करण्याच्या विचारात आहात?; एप्रिल महिन्यापासून कंपन्या मोठी वाढ करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 13:27 IST2021-03-15T13:15:30+5:302021-03-15T13:27:00+5:30
AC Prices Hike : लवकरच कंपन्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता, मोठे ब्रँड्स डबल डिजिट वाढ करण्याच्या तयारीत

सध्या गरमी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अनेकांचा कल हा कुलर किंवा एसी खरेदी करण्याकडे असतो.

परंतु आता एसीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या एसीच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

रेसिडेन्शिअल एसीच्या किंमतींमध्ये या गरमीच्या सीझनपूर्वी तब्बल ५ ते ८ टक्क्यांनी वाढ करण्याची योजना मोठ्या ब्रँड्सनं तयार केली आहे.

Voltas, Daikin, LG, Panasonic, Haier, Bluestar आणि Samsung सारख्या कंपन्यांनी डबल डिजिट ग्रोथची आशा व्यक्त केली आहे.

वाढती मागणी, वाढती गरमी आणि वर्क फ्रॉम होम पुढेही सुरू राहणार असल्यानं अतिरिक्त कुलिंग प्रोडक्ट्सची मागणी कायम राहणार असल्याचं यामागे कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे.

या कालावधीत कंपन्यांनी आपल्या एसीच्या रेंजमध्ये हेल्थ आणि हायजिनसारखे फीचर्स सादर केले आहे. ग्राहकांचा विषाणूपासून बचाव करणं हा यामागील उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.

तसंच विक्री वाढवण्यासाठी कंपन्या नो कॉस्ट ईएमआय, कॅशबॅक आणि सहज उपलब्धतेसारख्या पर्यायांचाही वापर करण्याची शक्यता आहे.

Daikin ही कंपनी आपल्या एअर कंडिशन्सच्या किंमतींमध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्याच्या तयारीत आहे. मेचल आणि कंप्रेसर जे मोठ्या प्रमाणात आयात केले जातात त्यांच्या किंमती वाढल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

या निर्णयामुळे विक्रीवर काही परिणाम होऊ शकतो. परंतु वाढती मागणी आणि गरमी वाढत असल्यानं किंमती वाढल्या तरी मागणीही वाढू शकते, अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंवलजीत जावा यांनी दिली.

दरम्यान, पॅनासॉनिकही या क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. तसंच कंपनीच्या उत्पादनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पॅनासॉनिक ही कंपनीदेखील या कालावधीत आपल्या एसीच्या किंमतीत वाढण्याच्या तयारीत आहे.

सध्या आम्ही बाजाराचा ट्रेंड पाहत आहोत आणि आम्ही एसीच्या किंमती ६ ते ८ टक्क्यांनी वाढवण्याच्याही तयारीत आहोत, अशी माहिती पॅनासॉनिक इंडिया आणि साऊथ एशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष शर्मा यांनी दिली.

तर दुसरीकडे फ्रिजच्या किंमतीतही ३ ते ४ टक्क्यांची वाढ करणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं. गेल्या काही महिन्यांमध्ये कमोडिटीच्या किंमतीत ३ ते ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये आपण एसीच्या विक्रीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ पाहत आहोत आणि या सीझनमध्येही हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.

टाटा समूहाची व्होल्टास ही कंपनीदेखील या सेंगमेंटमध्ये नावाजलेली आणि लोकप्रिय कंपनी आहे. त्यांनी यापूर्वीच आपल्या एसीच्या किंमतीत वाढ केली आहे.

















