लाँग टर्म गुंतवणुकीसाठी ५ बेस्ट स्टॉक्स; १०-१२ नाही तर ४५% पर्यंत मिळवू शकता परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:27 IST2025-04-04T10:25:32+5:302025-04-04T10:27:41+5:30
Share Market : ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अनिश्चितता यामुळे शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. मात्र, या संधीचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदा करुन घेता येऊ शकतो.

३ मार्च २०२५ पासून जगभरातील अनेक देशांवर अमेरिकन ट्रम्प सरकारने टॅरिफ लागू केले. यामुळे भारतासह अनेक देशातील शेअर मार्केटला फटका बसला. मार्च महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी ६ टक्क्यांनी सावरले आहेत. परंतु, असे असूनही शेअर बाजार अजूनही १२ टक्क्यांच्या खाली आहे. पण, या संधीचा फायदा दीर्घकालीन गुंतवणुकीतून करता येईल. आम्ही तुम्हाला ब्रोकरेज हाऊसच्या BUY रेटिंगच्या आधारे काही मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकची माहिती देत आहोत, जे तुम्हाला आगामी काळात ४५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
अशोक लेलँडचे शेअर्स सुमारे २०७ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. ब्रोकरेज हाऊसने त्यावर BUY रेटिंग दिले असून आणि २८५ रुपये टार्गेट प्राइज ठेवली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा ३७% अधिक आहे. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील मजबूतीमुळे या समभागात चांगली वाढ दिसून येते.
कोटक महिंद्रा बँकेचा शेअर २१३० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. ब्रोकरेज हाऊसचा विश्वास आहे की हा स्टॉक २५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे यात १७ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या समभागाचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२०२ आणि नीचांक १५४४ रुपये आहे. बँकिंग क्षेत्रातील त्याची मजबूत स्थिती याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय बनवते.
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलचे शेअर्स १७४५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. ब्रोकरेज हाऊसने त्याची टार्गेट प्राइज १९२० रुपये ठेवली आहे, ज्यामुळे १०% वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७७८ आणि नीचांक ११८३ आहे. 5G विस्तार आणि मजबूत ग्राहक आधार हे या स्टॉकसाठी सकारात्मक घटक आहेत.
फेडरल बँकेचा शेअर १९१ रुपयांच्या श्रेणीत आहे. ब्रोकरेज हाऊसने त्याची टार्गेट प्राइज २४० रुपये ठेवली आहे. यात २५% संभाव्य नफा मिळू शकतो. त्याची ५२ आठवड्यांची उच्चांकी २१७ रुपये तर सर्वात कमी १४८ रुपये आहे. ही बँक आपल्या डिजिटल बँकिंग विभागात सातत्याने सुधारणा करत आहे.
LT टेक्नॉलॉजीचे शेअर्स ४४४५ रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत. ब्रोकरेज हाऊसने त्याला BUY रेटिंग दिले असून ६५०० रुपयांचे टार्गेट प्राइज ठेवले आहे, ज्यामुळे ४५% पर्यंत वाढ शक्य आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५९९० आणि नीचांकी ४२२८ आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या मागणीचा या स्टॉकला फायदा होऊ शकतो. (Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)