भारत डायनॅमिक्सकडून ३८५ कोटींची ऑर्डर, ३ महिन्यांत २००% रिटर्न; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:28 AM2023-06-29T10:28:06+5:302023-06-29T10:41:13+5:30

Multibagger Stocks: महिन्याभरात या शेअरनं ग्राहकांना उत्तम रिटर्न्स दिले आहेत.

Multibagger Stocks: बुधवारी, स्मॉल कॅप कंपनी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या शेअर्सनं 2.24 टक्के वाढ नोंदवली आहे. यामध्ये 35 रुपयांची वाढ झाली असून तो 1608 च्या पातळीवर पोहोचला आहे. जर आपण गेल्या एका महिन्याबद्दल सांगायचं झालं तर, BEML च्या शेअरनं 1423 रुपयांवरून 1608 रुपयांवर उसळी घेतली आहे.

या कालावधीत गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांचा उत्तम परतावा दिला आहे. या वर्षी 15 मार्च रोजी, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे ​​शेअर्स 1158 रुपयांच्या पातळीवर होते, जिथून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळालाय.

1 जानेवारी 1999 रोजी, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे ​​शेअर्स 24 रुपयांच्या पातळीवर होते. तेव्हापासून गुंतवणूकदारांना सुमारे 6400 टक्के परतावा मिळाला आहे. 13 मार्च 2020 रोजी, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे ​​शेअर्स 540 रुपयांवर आले होते. तेव्हापासून गुंतवणूकदारांना सुमारे 200 टक्के परतावा मिळाला आहे.

हाय मोबिलिटी वाहनांच्या पुरवठ्यासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून 385 कोटी रुपयांचे कंत्राट मिळालं असल्याची माहिती भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडनं शेअर बाजाराला माहिती दिली. बीईएमएल कंपनीनं हाय मोबिलिटी वाहनांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून 423 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवलं होतं.

31 मार्च 2023 पर्यंत बीईएमएलची एकूण ऑर्डर बुक 8570 कोटी रुपये होती. जर आपण भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या सध्याच्या ऑर्डर बुकबद्दल बोललो तर ते 9378 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे ​​मार्केट कॅप 6715 कोटी रुपये आहे, जे गेल्या 3 वर्षांत 45 टक्के वाढत आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडनं मार्च तिमाहीसाठी उत्तम निकाल जारी केले आहेत. याशिवाय कंपनीची ऑर्डर बुक मजबूत होत आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या शेअर्सनं गेल्या वर्षभरात 53 टक्के परतावा दिला आहे, तर 3 वर्षात मल्टीबॅगर शेअरनं 200 टक्के परतावा दिलाय. तुम्हालाही शेअर मार्केटमधून कमाई करायची असेल, तर तुम्हाला भारत अर्थ मूव्हर्सचे शेअर्स लो लेव्हलवर खरेदी करण्याचा तज्ज्ञांनी दिला आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)