शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:01 IST

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात २ ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, शुक्र आणि केतु सिंह राशीत आहेत. बुध आणि रवि कन्या राशीत आहेत. २ ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत जाईल. तेथे त्याची युती मंगळाशी होईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ या राशींमधून राहील. सोमवारी सरस्वती आवाहन, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), मंगळवारी दुर्गाष्टमी असून, सरस्वती पूजन आहे. बुधवारी महानवमी आहे. एकविरा महानवमी पूजन आहे. आयुध पूजन आहे. गुरुवारी विजयादशमी (दसरा) आहे.
3 / 15
अश्वपूजा आहे. शुक्रवारी पाशांकुशा एकादशी आहे. शनिवारी प्रदोष आहे. शुक्रवारी रात्री ९.२८ पासून पंचक सुरू होत आहे. शनिवारी पंचक राहील. नवरात्राचे शुभ पर्व आणि एकूण ग्रहस्थिती पाहता हा काळ तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल, जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: हा आठवडा चांगला आहे. हा आठवडा आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याचा आहे. वायफळ खर्चांमुळे त्रस्त व्हाल. एखादी आर्थिक गुंतवणूक करावयाची असल्यास ती एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन करावी. जर दिखाऊपणासाठी जास्त पैसे खर्च केलेत तर समस्या होतीलच. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगले यश प्राप्त होईल. त्यांचे स्थगित झालेले काही प्रकल्प सुरु होऊ शकतात. मेहनत करून प्रगतीची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होईल. स्थान परिवर्तन संभवते. विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याने ते समस्याग्रस्त होतील. परंतु एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी जर जास्त मेहनत केली तर ते अवश्य यशस्वी होतील. कुटुंबियांसह त्यांचे वरिष्ठ व अध्यापकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये. सहसा एकटे राहू नये.
5 / 15
वृषभ: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. प्राप्तीसह खर्चासाठी तयार राहावे लागेल. बुडालेला पैसा परत मिळू शकतो. शेअर्स बाजारात सढळहस्ते गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल. त्यांना त्याचे फळ जरूर मिळेल. व्यापारात वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. विनाकारण कोणतेही काम करणे टाळावे. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना एखादी खुशखबर ऐकण्यास मिळू शकते. त्यांच्या एखाद्या चुकीवर पांघरूण घातले जाऊ शकते. विद्यार्थी वेळ अभ्यासासाठी देतील. एखाद्या मित्राने त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी ते वेळ अभ्यासासाठी देतील. एखाद्या स्पर्धेच्या तयारीसाठी ते वेळ देतील. ते एखादा अभ्यासक्रम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. दिनचर्येवर लक्ष ठेवावे लागेल.
6 / 15
मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. भरपूर पैसा खर्च कराल. कोणाला वचन दिले असल्यास ते पूर्ण कराल. एखाद्या धार्मिक कामासाठी पैसा खर्च करू शकता. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. परंतु, आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. व्यवसायात एका मागून एक प्रकल्प मिळतच राहतील, ज्यामुळे खुश व्हाल. असे असले तरी सावध राहावे लागेल. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहावे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. अन्यथा काही गडबड होण्याची संभावना आहे. एखाद्या नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. एखाद्या तणावामुळे विद्यार्थी त्रासून जातील. परंतु त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
7 / 15
कर्क: ह्या आठवड्यात विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. आर्थिक बाबींची काळजी करावी लागणार नाही. एखाद्या जुन्या योजनेतून चांगला लाभ मिळेल. तसेच खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. असे असले तरी एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. व्यापारात नवीन ओळखी होतील, ज्या फायदेशीर ठरतील. विचारपूर्वक कामात मार्गक्रमण कराल. त्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्यांना चांगले यश प्राप्त होईल. त्यांच्यावर कामाचा दबाव राहील. परंतु ते घाबरणार नाहीत. विनाकारण कोणतेही काम करू नये. ह्या आठवड्यात पदोन्नती संभवते. विद्यार्थी इतर प्रवृतींच्या बरोबरीने अभ्यासास वेळ देतील. जर त्यांचा एखादा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असला तर तो पुन्हा करण्याची सुरवात ते करू शकतात. अभ्यासासाठी त्यांना जर कोणाची मदत हवी असेल तर ती त्यांना सहजपणे मिळू शकेल. कुटुंबीय पूर्ण सहकार्य करतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा प्रगती करणारा आहे. सभोवतालच्या लोकांपासून सावध राहावे लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत राहिली तरी खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. विचारपूर्वक खर्च न केल्यास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा त्यांच्या हातून काही चुका झाल्याने वरिष्ठांची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागेल. सबब जास्त मेहनत करावी लागेल. परंतु त्याने घाबरून जाऊ नका. व्यापारात घाई केल्याने नुकसान होऊ शकते. तेव्हा योजना आखून कामे करावीत. विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होण्यात अडचणी येतील. जर त्यांनी लक्ष इतर प्रवृतींकडे दिले तर ध्येय प्राप्तीत समस्या निर्माण होईल. कोणतीही परीक्षा देताना आपण अति आत्मविश्वास बाळगू नये, अन्यथा त्यात समस्या निर्माण होऊ शकतात. ज्ञान वाढविण्यासाठी ते अध्यापकांशी बोलणी करू शकतात. कामाच्या बरोबरीने विश्रांतीसाठी वेळ काढावा.
9 / 15
कन्या: हा आठवडा काहीतरी नवीन करण्याचा आहे. ह्या आठवड्यात प्राप्ती जरी चांगली झाली असली तरी खर्च तसेच असतील. त्यामुळे टेन्शन येईल. ह्या आठवड्यात मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. ह्या आठवड्यात कोणत्याही योजनेत विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. व्यापारात एखादा नवीन सौदा करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. असे केल्यासच तो पूर्ण होऊ शकेल. अफवांना बळी पडू नये. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात एखादा पुरस्कार मिळू शकतो. त्यांना वरिष्ठांची साथ मिळेल. असे असले तरी कामात सतर्क राहावे लागेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणाच्या सांगण्यावरून विषयात कोणताही बदल करू नये. इतर प्रवृत्तीत व्यस्त राहिल्याने अभ्यासावर लक्ष थोडे कमी राहील.
10 / 15
तूळ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात पैशांमुळे टेन्शन वाढेल. आर्थिक स्थिती कमकुवत होईल. ह्या आठवड्यात एखाद्या कामासंबंधी मनात काही शंका असली तर ते काम करू नये. ह्या आठवड्यात कौटुंबिक नात्यात विशेष स्थिती निर्माण होऊ शकते. जर विचार न करता एखादी आर्थिक गुंतवणूक केलीत तर मोठे नुकसान सोसावे लागू शकते. व्यवसायात एखादा स्थगित झालेला सौदा पूर्ण होऊन एखादा मोठा प्रकल्प हाती लागू शकतो. ह्या प्रकल्पाची सुरवात लक्षपूर्वक कराल कि ज्यामुळे भविष्यात चांगला लाभ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना अंतर्गत राजकारणापासून सावध राहावे लागेल. कामगिरीने वरिष्ठ जरी प्रसन्न झाले तरी एखाद्या कामात समस्या असू शकते. विद्यार्थ्यांना आपले ज्ञान वाढविण्याची संधी मिळेल. ते काही काळासाठी मित्रांपासून दूर राहिल्यास हितावह होईल. बाहेर एखाद्या ठिकाणी जाऊन अभ्यास केल्यास चांगले यश प्राप्त करू शकता. ह्या दरम्यान एखाद्या स्पर्धेची तयारी करावी लागेल. विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. कोणाशीही पैशासंबंधी वचनबद्ध होऊ नका. एखाद्या जमिनीत किंवा प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी आर्थिक गुंतवणूक केलीत तर ती हितावह होईल. कोणाच्या मोहात येऊन एखादी योजना तयार करू नये. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या नवीन कामात रुची जागृत होऊ शकते. व्यापारात कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच मेहनतीवर लक्ष द्यावे. असे केल्यानेच नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांचे मनोबल उंचावेल. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. जे उपयुक्त असेल. ह्या आठवड्यात त्यांना एखादी मोठी संधी मिळेल. परंतु त्यांनी कामात ढिलेपणा ठेवू नये. जर एखाद्या सहकार्याची मदत घेण्याची आवश्यकता भासली तर ती सहजपणे मिळू शकेल. विद्यार्थ्यांना कामात एक नवीन टप्पा प्राप्त होईल. काही समस्या असली तर वरिष्ठांशी बसून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
12 / 15
धनु: हा आठवडा थोडासा गोंधळ उडवणारा आहे. पैशाच्या बाबतीत जास्त काळजी करण्यासारखे काही नाही. प्राप्तीचे स्रोत वाढल्याने खुश व्हाल. गरजांची पूर्तता सहजपणे करू शकाल. हौस मौज करण्याच्या काही वस्तूंची खरेदी करू शकाल. घर खरेदीचे आपले स्वप्न साकार होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात बुद्धीत विवेक वापरून कामे करावी लागतील. एखाद्या कामाच्या बाबतीत काही शंका असली तर ते करू नये. कोणतेही काम इतरांवर सोपवू नये. नोकरीच्या ठिकाणी काही समस्या असली तर सध्या ती बदलण्याचा विचार करू नका. नवीन नोकरीत समस्यांना सामोरे जावे लागेल. विद्यार्थी एखाद्या आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील, ज्यामुळे ते एक चांगला टप्पा गाठू शकतील. ते पूर्ण आत्मविश्वासाने प्रगती करतील. त्यांनी मनात कोणताही गोंधळ घालू नये. अति आत्मविश्वासात राहून परीक्षा दिल्यास त्यांना पुन्हा परीक्षेस बसावे लागू शकते.
13 / 15
मकर: हा आठवडा खुश करणारा आहे. कौटुंबिक कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील. सरकारी योजनांचा लाभ घ्याल, परंतु कोणाचे ऐकून एखादी आर्थिक गुंतवणूक केलीत तर नंतर पश्चाताप करावा लागेल. एखाद्यास दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कारकिर्दीत अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास नुकसान होईल. कोणत्याही कामात घाई करू नये. घाईघाईत एखादा निर्णय घेतल्यास पश्चाताप होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी मदत करतील व त्यामुळे खुश व्हाल. विद्यार्थ्यांना आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यात ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. परीक्षेत येणाऱ्या समस्यांबाबत गुरुजनांशी चर्चा करावी लागेल. घरी बसून विश्रांती घेणे हितावह होईल. तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन ताजेतवाने व्हा.
14 / 15
कुंभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात वायफळ खर्च करण्याची संभावना आहे. खर्च करण्याच्या सवयींमुळे पश्चाताप करावा लागेल. परंतु आपले बुडालेले पैसे मिळाल्याने ह्या आठवड्यात लाभ होऊ शकतो. व्यापारात आर्थिक गुंतवणूक करू शकता. ह्या आठवड्यात कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केल्याने त्यात उसळी आल्याचे दिसू लागेल. एखादी जुनी ओळख व्यवसाय वृद्धिंगत करण्यास मदतरूप ठरेल. परंतु विचारपूर्वक व्यावसायिक हात मिळवणी करावी. नोकरी करणाऱ्यांना सावध राहावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी भांडण होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान नोकरीच्या ठिकाणी कोणावरही भरवसा ठेवू नये. विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेची जोरदार तयारी करावी लागेल. ते अपूर्ण प्रकल्प सुद्धा पूर्ण करू शकतील. ज्ञान वाढविण्याची कोणतीही संधी सोडणार नाहीत. दिनचर्येत योगासन व व्यायामास समाविष्ट करावे.
15 / 15
मीन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. सुरवातीस जोमात खर्च कराल, परंतु नंतर तो कसा व कोठे झाला हे आपणास समजणार नाही. परंतु, एखाद्या योजनेत विचारपूर्वक गुंतवणूक केलीत तर ती हिताची होईल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात एखाद्या नवीन योजनेची सुरवात करू शकता. व्यावसायिक भागीदार एखादा चांगला सौदा घेऊन येतील. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती व पगारवाढ संभवते. त्यांनी अंतर्गत राजकारणात सहभागी होऊ नये. ह्या आठवड्यात विद्यार्थी अभ्यासास प्राधान्य देतील. ते एखाद्या नोकरीची तयारी करू शकतील. कामाच्या बाबतीत सावध राहावे लागेल. अभ्यासात जर विघ्न येत असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. मन विचलित होऊ देऊ नका, अन्यथा समस्या वाढतील. वाहन चालवताना सावध राहावे लागेल. कोणत्याही गोष्टीने विनाकारण भांडण करू नये. कामाबरोबर विश्रांतीसाठी वेळ काढावा.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDasaraदसराNavratriनवरात्रीNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५spiritualअध्यात्मिक