साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:30 AM2024-05-26T08:30:49+5:302024-05-26T08:40:59+5:30

Weekly Horoscope: २६ मे २०२४ ते ०१ जून २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात बुध, मंगळ आणि हर्षल यांचा राशीपालट आहे. बुध आणि हर्षल मेषेत आहे. ३१ मे रोजी बुध वृषभ राशीत जाईल. तेथे त्याची युती रवी, गुरू आणि शुक्र याच्याशी होईल, तसेच १ जून रोजी हर्षलही वृषभ राशीत जाईल. केतू कन्येत, प्लूटो मकरेत, शनी कुभेत आहे. मंगळ, राहु आणि नेपच्यून मीन राशीत असून, १ जून रोजी मंगळ मेष राशीत जाईल.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील. रविवारी संकष्टी चतुर्थी तर गुरुवारी कालाष्टमी आहे. बुधवारी रात्री ८.०६ पासून पचक सुरू होत आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पंचक आहे.

धार्मिक, सांस्कृतिक व्रतांसह त्रिग्रही गोचराचा प्रभाव कसा असेल, कोणत्या राशींना जीवनातील विविध आघाड्यांवर यश, प्रगती करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल? जाणून घेऊया...

मेष: कारकीर्द व व्यवसाय उंचावण्याच्या अनेक संधी मिळतील. एखादा मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. शासकीय माध्यमातून अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ दोघे आपल्यावर खुश होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. जमीन खरेदी-विक्रीची संधी मिळेल. कुटुंबियांसह एखादा प्रवास संभवतो. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. मुलांकडून आनंद वार्ता मिळू शकते. मुलांच्या उपलब्धीने मान-सन्मानात वाढ होईल.

वृषभ: या व्यक्ती रोजगाराच्या शोधात होत्या, त्यांना रोजगार मिळण्याची संभावना आहे. कारकीर्द व व्यवसाय उंचावण्याची चांगली संधी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्यावीच लागेल. जर काही कारणाने गैरसमज झाले असतील तर ते दूर होऊन आपल्या दोघातील प्रेम व विश्वास वाढेल. कुटुंबीयांनी स्वीकारल्यावर प्रेम जीवनाचे परिवर्तन विवाहात होऊ शकेल. शासनाशी संबंधित कार्य होण्याची पूर्ण संभावना आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना निव्वळ मित्रांचेच नव्हे तर कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन: आठवडा यश प्राप्त करून देणारा आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, मार्केटिंग, कमिशन इतादींवर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल. परीक्षा-स्पर्धा इत्यादींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी काळ आहे. एखादी शुभ सूचना मिळू शकते. ज्या व्यक्ती परदेशाशी संबंधित कार्य करत आहेत, त्यांना अनुकूल कालावधी असून, ते अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी होतील. जर एखादी व्यक्ती आवडली असेल व तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केलात तर कदाचित त्यात यश प्राप्त होऊ शकेल. जर आधीपासूनच एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर काळ शुभ फलदायी आहे. दांपत्य जीवनात गोडवा टिकून राहील.

कर्क: आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. घर दुरुस्तीसाठी जास्त पैसा खर्च झाल्याने आपल्या आर्थिक चिंता वाढतील. जर भागीदारीत व्यापार करत असाल तर भागीदाराशी काही गैरसमज निर्माण होण्याची संभावना आहे. अशा प्रसंगी मुद्दे स्पष्ट करून पुढील वाटचाल करणे उचित होईल. कार्यक्षेत्री विरोधक सक्रिय होतील. वाहन चालवताना सावध राहावे लागेल. प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक समस्या काही अंशी कमी होतील. समस्यांचे निराकरण करताना एखादा मित्र किंवा नातेवाईक पाठीशी उभा राहील. कठीण समयी प्रेमिका सावली होऊन उभी राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल.

सिंह: आठवडा शुभ फलदायी व लाभदायी आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. शासनाशी संबंधित कार्यात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती किंवा बदली मिळेल. ज्या व्यक्ती एखाद्या विशेष प्रकल्पावर कार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित केले जाऊ शकते. सामाजिक व धार्मिक कार्यात गोडी निर्माण होईल. सुख सोयींसाठी घेतलेल्या एखाद्या वस्तूमुळे किंवा वाहनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. स्वजनांचे गैरसमज दूर कराल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याच्या अनेक संधी येतील. वैवाहिक जोडीदाराशी संबंधित एखादी मोठी सिद्धी आनंदास कारणीभूत ठरेल.

कन्या: वाणी व व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोघांशी उत्तम समन्वय साधावा लागेल. कार्ये पूर्ण करण्यासाठी जास्त श्रम करावे लागतील. काही कारणाने वैवाहिक जोडीदाराशी वाद होऊ शकतो. एखादी कौटुंबिक समस्या कारकीर्दीस व व्यवसायास प्रभावित करू शकते. गैरसमज दूर करण्यासाठी वादाऐवजी संवाद साधावा. एखादा प्रवास संभवतो. हा प्रवास सुखद व लाभदायी होईल. आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्या योग्य प्रकारे सांभाळावी लागेल.

तूळ: आठवडा जीवनातील सर्व प्रकारचे यश व आनंदाने भरलेला आहे. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. कारकिर्दी उंचावण्याची-व्यवसाय वृद्धीची संधी प्राप्त होईल. जर नोकरीत बदल करू इच्छित असाल तर नवीन संधी प्राप्त होऊ शकते. प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत सापडतील. परीक्षा-स्पर्धा याच्या तयारीत असलेल्यांसाठी शुभ फलदायी आहे. महत्वपूर्ण कार्यात तेजी येईल व ती पूर्ण होण्याचा मार्ग दिसेल. घर व कार्यक्षेत्र ह्यात समतोल साधण्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रेम संबंध दृढ होऊन विश्वास वाढेल. दांपत्य जीवन सुखद होईल.

वृश्चिक: आठवड्यात जीवनाची गाडी कधी धीम्या गतीने तर कधी जलद गतीने धावत असल्याचे दिसून येईल. कारकीर्द-व्यवसाय पुढे नेण्यास मित्रांची व वरिष्ठांची मदत होईल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्यात भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. संततीशी संबंधित एखादी मोठी काळजी दूर होईल. अचानक धनलाभ होण्यात विघ्न येत असल्याचे दिसून येईल. असे असले तरी बुद्धिचातुर्याने ते दूर करण्यात यशस्वी व्हाल. वेळ व पैसा ह्यांचे नियोजन करावे लागेल, अन्यथा उगाचच त्रास सहन करावा लागू शकतो. प्रेमिकेच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ वैवाहिक जोडीदारासाठी व कुटुंबियांसाठी अवश्य काढा. प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनु: कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी व अपेक्षित यश प्राप्तीसाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. जर ऊर्जेचे व वेळेचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालात तर अपेक्षित यश प्राप्त होईल. असे असून प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वरिष्ठांशी अति जवळीक चांगली नसते त्याच प्रमाणे त्यांच्यापासून जास्त दूर राहणे योग्य नसते. एखाद्या स्त्री मित्राच्या मदतीने स्थगित झालेली कामे पूर्णत्वास जातील. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. असे असले तरी संततीशी संबंधित एखादी चिंता सतावू शकते.

मकर: कारकीर्द-व्यवसाय यांच्याशी संबंधित चिंता दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ व कनिष्ठ यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामानिमित्त केलेल्या प्रयत्नांचे व परिश्रमांचे फळ मिळत असल्याचे दिसेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. युवकांचा अधिकतम वेळ मौज-मजा करण्यात जाईल. जमीन-जुमल्याशी संबंधित विवादात निर्णय बाजूने लागू शकतो. कोणाच्या सांगण्यावरून चुकीचे पाऊल उचलू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता. सुख-सोयींसाठी वस्तू खरेदी करण्यात जास्त पैसा खर्च करू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल.

कुंभ: महत्वाच्या कार्यात यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन सुखद होण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. एखाद्या नवीन योजनेवर कार्य करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त साधन प्राप्त होईल. महिलांचे मन धार्मिक कार्यात खूपच रमेल. कुटुंबाशी संबंधित एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जर राजकारणात असाल तर एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ होऊन विश्वास वृद्धिंगत होईल. प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते. कुटूंबियांसह हसत - खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मीन: लहान-सहान गोष्टींना दुर्लक्षित करून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर इच्छा असेल की, आनंद प्रभावित होऊ नये म्हणून तर घरातील समस्या कार्यालयात व कार्यालयाच्या समस्या घरात आणू नका. बाजारात अडकलेला पैसा काळजीस कारणीभूत होऊ शकेल. आर्थिक देवाण-घेवाणीत सावध राहा. अत्यंत संघर्ष व प्रयत्न करून धन कमीच मिळेल, तर खर्चात वाढ होईल. आर्थिक चिंता वाढतील. पूर्वी केलेली बचत खर्च करावी लागेल किंवा उसने पैसे घेऊन काम चालवावे लागेल. कार्यक्षेत्री अचानकपणे एखादी नवीन जवाबदारी मिळाल्याने किंवा नावडत्या ठिकाणी बदली झाल्याने मन खिन्न होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मन व बुद्धीचा वापर जरूर करावा. कठीण समयी वैवाहिक जोडीदार सावली होऊन उभा राहील.