साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:33 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात बुध हा कर्क राशीत प्रवेश करीत आहे. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, रवी, गुरू व बुध मिथुन राशीत असून, रविवारी रात्री ९.२८ वाजता बुध कर्क राशीत जाईल. मंगळ व केतु सिंह राशीत आहेत. प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि व नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशींमधून राहील. सोमवारी प्रदोष आणि शिवरात्रि आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ अमावास्या प्रारंभ होत आहे. बुधवारी सायंकाळी ०४ वाजून ०१ मिनिटांपर्यंत ज्येष्ठ अमावास्या असणार आहे. २६ जून रोजी आषाढ मासारंभ होत आहे. याच दिवशी महाकवी कालिदान दिन, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी आहे. 3 / 15२७ जून रोजी जगन्नाथ रथयात्रा आहे. २८ जून रोजी विनायक चतुर्थी आहे. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना आगामी आठवडा सकारात्मक ठरेल. नोकरी पदोन्नती, पगारवाढ, व्यापारात नफा फायदा आणि करिअरमध्ये चांगले लाभ कोणत्या राशींना मिळण्याची शक्यता असू शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. विवाहित व्यक्तीजोडीदारासाठी एखादी भेटवस्तू घेऊन येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास उत्तम असेल. आर्थिक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल. वैयक्तिक खर्च कमी करून बचत वाढविण्यावर भर दिल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल. कारकीर्द समस्याग्रस्त असेल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने ते अभ्यासावर विशेष लक्ष देऊ शकणार नाहीत. विद्यार्थी जर एखाद्या व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम करू इच्छित असतील तर त्याची सुरुवात करू शकतात. व्यापाऱ्यांना नवीन कामात नुकसान सोसावे लागू शकते. अशा वेळी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे उचित ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागू शकते. काही कौटुंबिक समस्यांमुळे तणावग्रस्त असू शकता.5 / 15वृषभ: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. प्रेमीजनांना समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच त्यांनी नात्यात अहंकारास थारा देऊ नये. अन्यथा समस्या वाढून नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जोडीदारास भरपूर वेळ दिल्याने वैवाहिक जीवन सुखद होईल. खर्चात वाढ झाली तरी पैशांची कमतरता भासणार नाही. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करू शकता, जी उत्तम असेल. एखाद्यास उसने पैसे दिले असतील तर त्याचा परतावा मिळण्याची संभावना आहे. विध्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या संशोधनात सहभागी होऊ शकता. व्यापारात मेहनतीचे यथोचित फळ मिळू शकेल. व्यापारात प्रगती करण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांना एखादी खुशखबर मिळू शकते. सहकारी मदत करू शकतील. पदोन्नती संभवते.6 / 15मिथुन: विचारपूर्वक कामे करावी लागतील. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. एखाद्या जुन्या गोष्टीने वाद झाला तर तो सामंजस्याने दूर करावा. ह्या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ होईल. व्यापारी त्यांच्या योजनांवर लक्ष केंद्रित करतील. कोणाकडून ही उसने पैसे घेऊ नये. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. ह्या आठवड्यात वैवाहिक जोडीदाराच्या नावे एखादा व्यवसाय सुरू करू शकाल. व्यवसाय भरभराटीस येईल. ह्या आठवड्यात कौटुंबिक जवाबदाऱ्यांवर लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना मनाजोगे काम मिळाल्याने ते प्रसन्न राहतील. विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याने काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. मार्गदर्शनाची गरज भासली तर ते गुरुजनांचा सल्ला घेऊ शकतात. 7 / 15कर्क: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी काही वेळ सहवासात घालवावा लागेल. विवाहितांच्या जीवनात अहंकारामुळे निष्कारण वाद होतील, जे कुटुंबियांच्या मदतीने सोडविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत आपणास सावध राहावे लागेल. एखाद्या योजनेत विचार न करता पैसे गुंतविल्यास नुकसान होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात हिंडण्या-फिरण्यात भरपूर पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यापाऱ्यांच्या काही योजना स्थगित कराव्या लागू शकतात. असे असले तरी त्या पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात व्यवसायात काही बदल करू शकता. नोकरीत एखादे महत्त्वाचे पाऊल उचलाल. परंतु वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास काही गडबड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होऊ शकतात. मित्रांच्या सहवासात बराचसा वेळ वाया घालवाल, ज्याचा पश्चाताप होऊ शकतो. 8 / 15सिंह: ह्या आठवड्यात तणावग्रस्त राहाल. प्रेमिकेमुळे समस्या निर्माण होतील. विवाहित व्यक्ती एकमेकांना समजून घेऊन नाते अधिक सुदृढ करतील. मुलांकडे लक्ष देऊ शकतील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. ज्या व्यक्ती शेअर बाजाराशी संबंधित आहेत त्यांना लाभ होण्याची संभावना आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतलात तर चांगला फायदा होऊ शकेल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. त्याची परतफेड होताना समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. कारकिर्दीत असलेल्या समस्यांतून सुटका होईल. व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. असे करताना काही नवीन लोकांच्या संपर्कात याल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ह्या आठवड्यात नोकरी मिळू शकते. सध्याच्या नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय नोकरीसाठी अर्ज करू शकता. विद्यार्थी भ्रमात राहिल्याने अभ्यासावर योग्य तितके लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. असे असले तरी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना वेळ काढावाच लागेल. 9 / 15कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजन भरपूर वेळ देऊन एकमेकांना समजून घेतील. काही वाद असला तर तो सामंजस्याने सोडवतील. चांगली अर्थ प्राप्ती होईल. गरजा सुलभतेने पूर्ण करू शकाल. संपत्तीशी संबंधित एखादा वाद असल्यास तो संपुष्टात येऊ शकतो. भविष्यासाठी एखादी आर्थिक योजना तयार कराल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांच्या योजनेत चढ-उतार येऊन ते मनाने त्रस्त होतील. त्यांनी जर कोणाशी व्यावसायिक भागीदारी केली तरी ती नुकसानदायी होईल. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. काही खर्च आपल्या मनाविरुद्ध करावे लागतील. वैवाहिक जोडीदार काही वस्तूंची मागणी करण्याची शक्यता असून, त्या पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्यांची कामे वेळेत न झाल्याने वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. नोकरीत बदल करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थी त्यांचा खंडित झालेला अभ्यास पूर्ण करून एखाद्या स्पर्धेची तयारी करू लागतील. परंतु त्याचे अपेक्षित फळ विलंबाने मिळेल.10 / 15तूळ: हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जाबाबदाऱ्यांमुळे वैवाहिक जोडीदाराशी काही वाद होतील. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकतील. कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. व्यापाऱ्यांनी जर त्यांच्या व्यवसायात काही बदल केला तर त्यात त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. स्थगित झालेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांनी सतर्क राहावे. कामाच्या तणावामुळे त्यांच्या कामात चुका होण्याची संभावना आहे. तेव्हा ह्या आठवड्यात नोकरीवर विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणतीही कसर सोडू नये. उच्च शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे. जर एखादी परीक्षा दिली असली तर त्याचे परिणाम ह्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. एखादा मित्र अध्ययनात अडथळा निर्माण करण्याची संभावना आहे. 11 / 15वृश्चिक: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. सभोवतालच्या लोकांपासून थोडे सावध राहावे. विवाहितांना जोडीदाराशी असलेले वाद दूर करावे लागतील, अन्यथा वैवाहिक जीवनातील समस्या वाढू शकतात. आपसातील वाद चार भिंतीच्या बाहेर जाऊ देऊ नयेत. प्रेमीजन प्रेमिकेस वेळ देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यातील समस्या वाढतील. ह्या आठवड्यात एखादी आर्थिक समस्या दूर होऊ शकते. अडकलेले पैसे मिळण्याची संभावना आहे. शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल. एखाद्या सौद्यामुळे समस्या होऊ शकते. योजनांचा फायदा दुसरीच व्यक्ती घेण्याची संभावना आहे. नोकरीतील समस्येतून सुटका होईल. दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात सध्याच्या नोकरीत पदोन्नती संभवते. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. पूर्वी त्यांचे अभ्यासात जे काही नुकसान झाले होते ते आता भरून काढावे लागेल. ते एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.12 / 15धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. काही कौटुंबिक समस्यांमुळे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात वाद होण्याची संभावना असून नात्यात दुरावा येऊ शकतो. प्रेमिकेच्या वर्तनात बदल झाल्याने प्रेमीजनांच्या जीवनात समस्या येऊ शकतात. त्या चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात खर्च वाढल्याने मन त्रासून जाईल. घरासाठी किंवा वाहन खरेदीसाठी जास्त पैसा खर्च होण्याची संभावना आहे. व्यवसायात मिश्र फळे मिळण्याची संभावना आहे. काही योजनांवर बराच पैसा खर्च झाल्याने चिंतित असाल. परंतु ह्या योजना चांगला लाभ मिळवून देतील. असे असून काहीसे चिंतित असण्याची संभावना आहे. हा आठवडा नोकरी बदलण्यास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळेल. परंतु ते कौटुंबिक समस्येने त्रस्त असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अध्ययनावर होऊ शकतो. ते ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतील.13 / 15मकर: प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या भावनांचा सन्मान करतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारास एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जातील. कौटुंबिक जवाबदाऱ्या सुद्धा सहजतेने पूर्ण कराल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता, ज्यात दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर ती चांगला लाभ मिळवून देईल. एखादी आर्थिक योजना तयार कराल. ह्या आठवड्यात काही धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च करू शकता. भागीदारी व्यवसायात व्यापाऱ्यांनी सावध राहावे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा खर्च वाढल्याने समस्या वाढतील. ह्या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल, जी सहजपणे मिळू शकेल. जर नोकरीत बदल करण्याचा विचार केला तर ते हिताचे होईल. विद्यार्थी ह्या आठवड्यात नवीन काही तरी शोधून काढतील. ते पूर्ण जोमात अध्ययन करू शकतील. असे असले तरी त्यांच्या समस्या वाढण्याच्या संभाव्यतेकडे त्यांना थोडे दुर्लक्ष करावे लागेल. असे केल्यास त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील. 14 / 15कुंभ: सर्व कामे विचारपूर्वक करावी लागतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्या तरी ते जोडीदाराशी संबंधात दृढता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदारास बरे वाटेल असे करतील. प्रेमीजनांत सामंजस्याच्या अभावामुळे भांडणात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात विनाकारण जास्तीचा खर्च करण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. जर कर्जासाठी अर्ज केला असेल तर ते कर्ज सहजपणे मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांची कामानिमित्त धावपळ वाढेल. जर विश्वास ठेवून कोणाला गुप्त माहिती दिली असेल तर ती व्यक्ती समस्या वाढवू शकेल. वरिष्ठांशी वाद होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. भागीदारीत नुकसान संभवते. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखू शकाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले यश प्राप्त होईल. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. एखादी शासकीय शिष्यवृत्ती मिळू शकते. 15 / 15मीन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनातील समस्या जोडीदाराशी चर्चा करून सोडवाव्यात. प्रेमीजन कामातील व्यस्ततेमुळे एकमेकांपासून काही काळासाठी दूर गेल्याने त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने खर्चांवर नियंत्रण ठेवताना बचतीवर लक्ष ठेवावे लागेल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे प्राप्तीत वाढ होईल. गरजांवर जास्त पैसा खर्च करू शकता. व्यवसायातून पैसा कमवाल. विचारपूर्वक योजनांची सुरुवात केल्याने चांगला आर्थिक फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी काही वाद झाला असेल तर तो चर्चेद्वारे दूर होऊ शकेल. त्यामुळे कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही. सभोवताली वावरणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी एखादे महत्त्वाचे पाऊल उचलावे लागेल. ते अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करू शकतात. एखादे नवीन संशोधन करण्यास आठवडा अनुकूल आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.