By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:01 IST
1 / 15दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तेथे त्याची युती रवि, शुक्र, राहू आणि बुध यांच्याशी होईल. मंगळ आणि राहु यांची युती फारशी सकारात्मक मानली जात नाही. तसेच सिंह राशीत केतु विराजमान आहे. त्यामुळे या सर्व ग्रहांचा केतुशी समसप्तक योग जुळून येत आहे. 2 / 15दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रह कुंभ राशीत विराजमान असेपर्यंत राहु आणि केतुशी जुळून येत असलेला अंगारक कुजकेतू योग कायम राहणार आहे. कुंभ ही शनिचे स्वामित्व असलेली रास आहे. मंगळाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि राहु-केतु या ग्रहांशी जुळून येत असलेल्या युती योगाचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव दिसून येईल, असे सांगितले जात आहे. 3 / 15मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश होताच आदित्य मंगल नामक राजयोगही जुळून येत आहे. तसेच कुंभ राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. दोन प्रतिकूल योग, तर चार शुभ योगांमुळे पुढील काही दिवस अनेक राशींना चांगला लाभ मिळवून देणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...4 / 15मेष: आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. मात्र वाढते खर्च चिंतेत टाकू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असून, व्यवसाय वाढवू शकता; व्यवसायाची चांगली प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना थोडी त्रास सहन करावा लागू शकतो. प्रेम संबंधांत चढ-उतारांचा सामना करावा लागेल; प्रिय व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनातही तणाव राहील, ज्यामुळे मन अस्वस्थ असेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते; एकाग्रता साधण्यात अडचणी येतील.5 / 15वृषभ: आर्थिक दृष्टीने पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट कराल, परंतु अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णमयी असून व्यवसाय 'दिन दुप्पट रात चौप्पट' प्रगती करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ थोडी नाजूक आहे; कामाच्या ठिकाणी हुकूमशाहीचे वातावरण जाणवू शकते. प्रेम संबंधांत जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनात वातावरण प्रसन्न राहील. एकमेकांसोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला असून नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढेल.6 / 15मिथुन: आर्थिक स्थितीचा विचार करता, मोठा खर्च होऊ शकतो; महागड्या वस्तूंच्या खरेदीमुळे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी काळ उत्तम असून व्यापार व्यवस्थित चालेल; काही प्रभावी व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात उच्च पद मिळण्याचे योग आहेत. प्रेम संबंधांत जोडीदारावर संशय घेतल्यामुळे किंवा त्यांचे म्हणणे नीट न ऐकल्यामुळे दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदार कामात खूप व्यस्त राहील, त्यामुळे ताळमेळ राखताना सावध राहा. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडू शकते; परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्यास समस्या दूर होतील.7 / 15कर्क: आर्थिक स्थिती चांगली असली तरी उत्पन्नासोबतच अचानक मोठा खर्च समोर उभा राहू शकतो. करिअर आणि व्यवसायाचा विचार करता, बिझनेस पार्टनरच्या प्रकृतीमुळे व्यापारात नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे, मात्र अतिआत्मविश्वास टाळा. प्रेम संबंधांसाठी हा काळ अतिशय रोमँटिक असेल; एकमेकांना भेटवस्तू द्याल. वैवाहिक जीवनात मात्र तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे, पण शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन थोडे कमी लागेल.8 / 15सिंह: आर्थिक स्थिती जेमतेम राहील; परिस्थिती सुधारण्यासाठी एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांमुळे काही अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अतिशय उत्तम असून, मान-सन्मान मिळेल. प्रेम संबंधांत प्रिय व्यक्तीला चोरून भेटण्याचा प्रयत्न कराल, पण कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे त्यात अडथळा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात समाधानी असाल. जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखू शकता. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर विशेष लक्ष राहील आणि त्यांना यश मिळेल, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी सावध राहावे.9 / 15कन्या: आर्थिक स्थिती मजबूत असेल, धनाची कमतरता भासणार नाही, पण खर्चही तेवढेच अवाढव्य असतील; अनावश्यक खर्च टाळणे कठीण जाईल. करिअर आणि व्यवसायाबाबत समाधानी असाल; व्यापार गती पकडेल आणि नवीन ठिकाणी शाखा उघडू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ उत्तम असून सरकारी नोकरीत असलेल्यांना आनंदाची बातमी मिळेल. प्रेम संबंधांत तुमची लाइफ अतिशय सुंदर असेल. जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. वैवाहिक नाते दृढ होईल. एकमेकांवरील प्रेम व्यक्त कराल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम असून स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना करिअरमध्ये मोठी प्रगती साधता येईल.10 / 15तूळ: आर्थिक स्थितीबाबत अडचणींचा सामना करावा लागू शकतो; उत्पन्न कमी राहील आणि खर्च खूप वाढलेले असतील. व्यापाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागेल; अतिआत्मविश्वासामुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. प्रिय व्यक्तीसोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनातही तणाव राहील, जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलताना संकोच वाटू शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन कमी लागेल, ज्यामुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.11 / 15वृश्चिक: पैशांच्या बाबतीत सुरुवातीला अडचणी येतील, परंतु आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल, पण त्यासोबतच खर्चही वाढलेले असतील. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. विरोधक कार्यात अडथळे आणू शकतात. प्रेम संबंधांत गैरसमजांमुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंध मात्र चांगले राहतील; जोडीदारासोबत रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊ शकता. विद्यार्थी अभ्यासाबाबत खूप सतर्क राहतील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.12 / 15धनु: आर्थिक बाबतीत खूप सावध राहण्याची गरज आहे; उत्पन्न वाढले तरी खर्चातही मोठी वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी काळ उत्तम असून एखाद्या सरकारी योजनेतून मोठा लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे, सहकारी तुमचे कौतुक करतील. प्रेम संबंधांत जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता किंवा लॉन्ग ड्राइव्हला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात तणाव दिसू शकतो, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन कमी लागेल; उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.13 / 15मकर: आर्थिक दृष्टिकोनातून खूपच लाभदायक काळ आहे; जुन्या कर्जातून मुक्तता होऊ शकते. बचत वाढेल. बँक बॅलन्समध्ये वृद्धी होईल. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. भरपूर धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेल्या जबाबदाऱ्यांचा ओढाताण होऊ शकतो. प्रेम संबंधांत खूप रोमँटिक असाल आणि जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात जोडीदार कामानिमित्त काही काळासाठी दूर जाऊ शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.14 / 15कुंभ: आर्थिक स्थिती उत्तम राहील; उत्पन्न भरघोस असेल आणि खर्च नगण्य असतील. व्यवसायात आनंदी असाल आणि बिझनेस पार्टनरकडून मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रेम संबंधांत थोडा तणाव राहील, पण मित्रांच्या मध्यस्थीमुळे नाते टिकून राहील. वैवाहिक संबंध अतिशय मधुर राहतील; तुमच्या जोडीदाराला एखादे मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांचे मात्र अभ्यासात मन कमी लागेल.15 / 15मीन: आर्थिक स्थिती सामान्य राहील; पैसे वाचवण्याकडे कल ठेवा. फालतू खर्च टाळा. व्यापाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे तर, बुद्धिमत्तेने व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणारे जातक उत्तम काम करतील, ज्यामुळे त्यांची प्रशंसा होईल. प्रेम संबंधांत जोडीदाराशी किरकोळ वाद किंवा खटके उडू शकतात. वैवाहिक संबंध मात्र चांगले राहतील; कुटुंबाचे महत्त्व समजून घ्याल. जोडीदार प्रत्येक परिस्थितीत पाठीशी उभा राहील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींत जास्त भरकटेल, ज्यामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.