श्रीरामोत्सव: ९ राशींवर अपार रामकृपा, धनलाभाचा योग; संपत्ती प्राप्तीची संधी, सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:39 AM2024-01-22T08:39:54+5:302024-01-22T08:56:56+5:30

Weekly Horoscope: २१ जानेवारी २०२४ ते २७ जानेवारी २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, मंगळ, शुक आणि बुध धनूत, रवी आणि प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून, मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील.

या सप्ताहात मंगळवारी प्रदोष, गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा, गुरुपुष्यामृत आणि माघ स्नानाची समाप्ती, शुक्रवारी प्रजासत्ताक दिन आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा आहे. अवघा देश राममय झाला असून, रामभेटीची आस देशवासीयांना लागली आहे.

श्रीरामोत्सवामुळे आगामी काळ अतिशय अद्भूत आणि शुभ चैतन्यमयी ठरू शकणारा आहे. कोणत्या राशींसाठी आठवड्याभराचा काळ कसा ठरू शकेल? शिक्षण, आर्थिक आघाडी, व्यवसाय, बिझनेस, कुटुंब, करिअर अशा बाबतीत यश, प्रगतीच्या संधी कोणत्या राशींना मिळू शकतील? जाणून घेऊया...

मेष: आगामी कालावधी अत्यंत चांगला आहे. काही ना काही चांगली बातमी मिळत राहील. पैशांचा ओघ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवता येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरी मिळण्याची संभवता आहे. व्यवसायात धनलाभ होईल. विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसतील. त्दिनचर्येबदल केलात तर ते हिताचे होईल. शेअर्स बाजारात खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी. प्राप्तीत विशेष वाढ होणार नाही.

वृषभ: आगामी काळ सामान्यच आहे. प्रेमिकेस मनातील विचार सांगाल व त्यामुळे ती अत्यंत खुश होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे दिसून आले तरी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तो लवकरच संपुष्टात येईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. धनप्राप्ती संभवते. व्यवसाय वृद्धीसाठी मित्र आपणास मदत करतील. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक किंवा तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार केलीत तर ते हिताचे होईल. जोखीम पत्करून कोणतीही गुंवतणूक करू नये.

मिथुन: विशेष असा कालावधी नाही. कौटुंबिक जीवनात सर्व काही ठीक राहीले तरी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमुळे काही वाद होण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारासह ते सुखद क्षण व्यतीत करू शकतील. प्राप्तीच्या बाबतीत चढ-उतारांचा काळ आहे. भविष्यात मोठा फायदा देऊ शकेल अशी एखादी गुंतवणूक आपण कराल. सुख-सोयींसाठी भरपूर पैसा खर्च कराल. कौटुंबिक स्थिती उत्तम असेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. असे केल्याने त्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण होऊन परीक्षेत चांगला परिणाम मिळू शकेल. भागीदारीत व्यापार करत आहेत त्यांना खूप मोठा लाभ प्राप्त होईल.

कर्क: चांगला कालावधी आहे. प्रणयी जीवनात सुख-शांती नांदेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत यश प्राप्त होईल. व्यापारी व्यापारात नव-नवीन युक्त्या लढवून व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी होतील. जोखीम असलेली गुंतवणूक टाळावी. मुलांच्या भविष्यासाठी थोडी आर्थिक गुंतवणूक कराल. सरकारी कामे विचारपूर्वक हाती घ्यावी. तांत्रिक विषयांचे शिक्षण घेत असणारे विद्यार्थी यशस्वी होतील. स्पर्धेत यश मिळविण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे. मित्रांमुळे प्राप्तीची संधी मिळण्याची संभावना आहे. धनलाभ संभवतो. घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी काही पैसे खर्च कराल.

सिंह: उत्तम काळ आहे. प्रणयी जीवनातील गोडवा वाढेल. एकमेकांप्रती आकर्षण राहील. एखादी गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील. थकबाकी मिळेल. भावंडाच्या विवाहात येत असलेले अडथळे दूर होतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आईजवळ मन मोकळे करू शकाल. मुलांचे भरपूर सहकार्य मिळेल. प्रवास फायद्याचे ठरेल.

कन्या: आगामी काळ मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. नोकरीच्या जोडीने एखादे अंशकालीन काम कराल. प्राप्तीत वाढ होईल. पैतृक व्यवसायाची वृद्धी व्हावी, या हेतूने त्यात काही बदल कराल. विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करतील. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ते खूपच परिश्रम करतील. दिनचर्येत काही बदल कराल. आईजवळ मन मोकळे करू शकाल. मुलांसाठी खूप खर्च कराल. एखाद्या व्यक्तीच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी भेटवस्तू घेण्यावर जास्त खर्च करू शकता.

तूळ: आगामी काळ चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. व्यवसायात नवनवीन कार्य करण्याची संधी मिळेल. व्यावसायिक भागीदारामुळे लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वकच करावी. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्या प्राप्तीसाठी विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतात. स्वतःसाठी एखाद्या नवीन वाहनाची खरेदी कराल. पैतृक संपत्तीची प्राप्ती होईल. एखाद्या नातेवाईकांकडून धनलाभ होईल. आवडत्या चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च करू शकाल. थकबाकी मिळविण्यासाठी खूप परिश्रम करत असल्याचे दिसून येईल.

वृश्चिक: आगामी काळ खूपच चांगला आहे. एकाच वेळी कुटुंबीय खुश असल्याचे दिसून येईल. प्रेम संबंध दृढ होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीकडून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. पैसा मिळण्याची संभावना आहे. प्राप्तीत वाढ होईल. मानसिक समाधान जाणवेल. खर्च करावा लागू शकतो. व्यापारात मोठी गुंतवणूक करणे टाळावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मान-सन्मान प्राप्त होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. स्पर्धेत यश प्राप्त होईल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. घर सजावटीसाठी काही खरेदी कराल. नातेवाईकांत उठ-बस होईल. सर्वजण एकजुटीने कार्य करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.

धनु: आगामी काळ चांगला आहे. प्रेमसंबंधात गोडवा राहील. वैवाहिक जीवनात जोडीदारासह सुखद क्षण व्यतीत करत असल्याचे दिसून येईल. प्राप्तीत चढ-उतार येतील. सरकारी योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर होईल. पूर्वी केलेल्या योजनांचा पूर्ण लाभ होईल. व्यापारात भागीदारामुळे चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत काही समस्यांचा सामना करावा लागेल. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी काळ अनुकूल आहे. परिश्रम यशस्वी होतील. घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होईल. सर्वजण एकत्रितपणे खरेदीसाठी जातील. नव्या पाहुण्याच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. धनप्राप्तीची संभावना आहे.

मकर: आगामी काळ मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती असल्याचे दिसून येईल. कुटुंबीय एकजुटीने कार्य करत असल्याचे दिसून येईल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. भविष्यात चांगला लाभ होईल. वडिलांकडून धनलाभ संभवतो. भावंडे आर्थिक मदत करतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. व्यापार वृद्धीसाठी नवीन योजनांची अंमल बजावणी कराल. विद्यार्थी अभ्यासासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतात. गुरुजनांचे सहकार्य मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न होईल. मुलास चांगली नोकरी मिळाल्याने अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल.

कुंभ: आगामी काळ उत्तम आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. भावाच्या विवाहावर शिक्कामोर्तब होईल. मंगल कार्याचे आयोजन होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घेऊ शकता. प्राप्तीत हळूहळू वाढ होईल. सरकारी योजनांचा लाभ होईल. एखादे नवीन कंत्राट मिळण्याची संभावना आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी आई - वडील मदत करतील. इच्छा नसताना काही खर्च करावे लागू शकतात. मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखू शकता. योगासन व ध्यान-धारणा, सकाळचे चालणे इत्यादींचा दिनचर्येत समावेश कराल. विद्यार्थी आवडीचे विषय अभ्यासून खूप आनंदित झाल्याचे दिसून येईल. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे.

मीन: आगामी काळ सुखावह होणारा आहे. प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. पैतृक संपत्तीची प्राप्ती होईल. धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेले काम वेळेवर पूर्ण करू शकतील. व्यवसायात स्थगित झालेल्या योजना पुन्हा सुरु कराल. वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकाल. इच्छापूर्ती होईल. नवीन वाहनाचे सौख्य प्राप्त होईल. जोखीम असलेली गुंतवणूक करणे टाळावे. सरकारी योजनांचा लाभ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. जुन्या नात्यात नावीन्य दिसू लागेल. चांगली बातमी मिळेल.