साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:16 IST2025-12-21T11:49:16+5:302025-12-21T12:16:10+5:30
Weekly Horoscope: २१ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: पौष महिन्याने सुरू होणाऱ्या या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतु सिंह राशीत, बुध वृश्चिक राशीत आहे. रवि, मंगळ आणि शुक्र धनू राशीत आहेत. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींमधून राहील. रविवारपासून उत्तरायण सुरू होत आहे. मंगळवारी विनायक चतुर्थी (अंगारक योग) आहे. शुक्रवारी बांगर षष्ठी आहे. बुधवारी सायंकाळी ७.४७ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पंचक आहे.

धनु राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच शुक्रादित्य, मंगल आदित्य आणि गुरू-चंद्राचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच महालक्ष्मी राजयोगही जुळून येत आहे. २०२५ मधील शेवटच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया...

मेष: ऍक्टिव्ह स्क्रीन टाइम कमी ठेवा. रागाच्या भरात वाहन चालवणे टाळा. व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने नशिबाची साथ मिळेल. एखादा मोठा किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असून, सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. जोडीदाराशी नाते प्रेमळ राहील. परंतु अहंकारामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक नात्यात जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा उत्तम, शेअर बाजारातून लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा फिरणे, मौजमजेत जास्त जाईल; तरीही एकूण ज्ञानवृद्धीसाठी काळ चांगला आहे.

वृषभ: सकाळी नियमित फिरणे व थोडा व्यायाम केल्यास मानसिक तणाव टळेल. प्रेमसंबंधात अहंकारामुळे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात; संयमाने संवाद साधा. वैवाहिक जीवनात प्रेम आणि उत्साह दिसून येईल. व्यवसायात चांगले यश हवे असल्यास जास्त मेहनत आवश्यक आहे. नोकरीत एखाद्या कामात गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे शांतपणे काम करा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढवण्याचे नवे मार्ग सापडतील; घराच्या नूतनीकरणावर भरपूर खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासपद्धतीत मोठे बदल टाळावेत. सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षेत यशासाठी हा आठवडा अनुकूल आहे.

मिथुन: आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत आनंदी व प्रेमळ क्षण घालवाल. एकत्र काही नवीन काम सुरू करण्याची चर्चा होऊ शकते. व्यवसायात मोठा खर्च संभवतो; नव्या डीलबाबत घाई करू नका. नोकरीत जोश आणि उत्साह वाढेल, नोकरी बदलण्याचा विचार असल्यास काळ अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या घर, मुले किंवा रिनोवेशनवर खर्च वाढेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून भटकू शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. सरकारी नोकरीच्या तयारीसाठी वेळ चांगला आहे.

कर्क: या आठवड्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. मॉर्निंग वॉक व योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. व्यवसायात चांगला नफा, तसेच नवीन प्रोजेक्टचे योग दिसतात. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी समाधानी राहतील; बदल हवा असल्यास विचार करू शकता. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत रम्य क्षण अनुभवता येतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ देणे व सुसंवाद ठेवणे अत्यंत गरजेचे. आर्थिकदृष्ट्या घराच्या दुरुस्ती, सजावट किंवा वाहन खरेदीवर खर्च होऊ शकतो, तरीही अडकलेले पैसे परत मिळाल्याने स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य व मेहनत वाढवावी; विशेषतः सरकारी नोकरीच्या तयारीसाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील.

सिंह: या आठवड्यात शारीरिक थकवा जाणवू शकतो. मानसिक तणावामुळे वैद्यकीय खर्च वाढू शकतो. व्यवसायात मोठा प्रोजेक्ट किंवा करार हाती येण्याची शक्यता आहे, ज्यातून चांगला फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा संघर्षमय; वरिष्ठांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात, म्हणून संयमाने वागा. प्रेमसंबंधात गोंधळ किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. हुशारीने नाते सांभाळल्यास स्थिरता येईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मनपसंत भेट मिळू शकते, नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या नवीन वाहन खरेदीचे योग; पूर्वी झालेल्या तोट्याची भरपाई आता हळूहळू होऊ शकते. विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून व सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कन्या: या आठवड्यात आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे. रागावर नियंत्रण आवश्यक. व्यवसायात एखादी मोठी डील हातातून निसटल्यास चिडचिड होऊ शकते. नोकरीत परिस्थिती आव्हानात्मक असून अधिक संघर्ष व मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधात नाते जपून सांभाळा; बेपर्वा वृत्तीमुळे तणाव आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यातही वाद-विवाद वाढण्याची शक्यता असून नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊ नये म्हणून संयम गरजेचा आहे. आर्थिकदृष्ट्या तंगी जाणवेल; मित्रांच्या संगतीत अनावश्यक खर्च टाळा. उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकरीसाठी अत्यंत मेहनत आवश्यक आहे; अभ्यासात कसूर सोडू नका.

तूळ: या आठवड्यात मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. व्यवसाय वाढविण्याकरिता जास्त मेहनत व नियोजन आवश्यक आहे, तेव्हाच यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार असल्यास सध्या वेळ अनुकूल नाही. प्रेमसंबंधात भावनिक दुरावा जाणवू शकतो; छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ नये याची काळजी घ्यावी. दांपत्य जीवनात अहंकार किंवा बोलण्यातली कडवटपणा नात्यात तणाव निर्माण करू शकतो. आर्थिकदृष्ट्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या; प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे योग चांगले. विद्यार्थ्यांनी ज्ञानवृद्धीसाठी जास्त वेळ वाचन, अभ्यास आणि नवीन कौशल्यांवर द्यावा. पार्ट टाइम नोकरी किंवा अतिरिक्त कामासाठीही काळ चांगला आहे.

वृश्चिक: या आठवड्यात नियमित तपासणी व औषधे आवश्यक. व्यवसायात वाढीसाठी नवीन व्यावसायिक संपर्क तयार करावे लागतील. मेहनत जास्त असेल. नोकरीत कंटाळा आल्याने नोकरी बदलण्याची इच्छा असेल, पण सध्या वेळ योग्य नाही. प्रेमसंबंधात मनमोकळेपणे बोलू शकाल. वैवाहिक जीवन आनंदी; जोडीदारासोबत मस्ती, गप्पा आणि सहवासाचा आनंद घ्याल. आर्थिकदृष्ट्या कुणालाही पैशाचे आश्वासन देताना सावध राहा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. लोन घ्यायचे असल्यास वेळ अनुकूल. उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्यांनी खूप मेहनत केल्यास यश मिळेल.

धनु: या आठवड्यात मसालेदार, तेलकट पदार्थांपासून दूर राहा. प्रेमसंबंधात अहंकारामुळे प्रिय व्यक्तीसोबत वाद निर्माण होऊ शकतो; शब्दांचे भान ठेवा. वैवाहिक जीवनात मात्र प्रेमाची कमी जाणवणार नाही, जोडीदारासोबत ट्रिप घडू शकते. व्यवसायात प्रगतीसाठी जास्त मेहनत करावी लागेल; नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जुनी नोकरी सोडून नवीन संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या कौटुंबिक खर्च वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत ओव्हरकॉन्फिडन्स टाळावा. घरातील वातावरणात तणाव असल्यास बाहेरील शांत ठिकाणी अभ्यास करणे योग्य. एकूणच, साधेपणा आणि शिस्त हाच आठवड्याचा मंत्र.

मकर: योग, प्राणायाम आणि मॉर्निंग वॉक फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात जिच्यावर प्रेम करता तिच्याशी विवाहाचे योग दिसतात; नात्यात रोमँस वाढेल. वैवाहिक लोकांसाठीही सहल आणि एकत्र वेळ घालवण्याचे सुंदर क्षण येतील. व्यवसायात मोठे बदल करण्यासाठी वेळ अनुकूल नाही; नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी मात्र चांगली संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या प्रिय व्यक्तीवर, भेटवस्तूंवर खर्च वाढू शकतो; शेअर मार्केट आणि प्रॉपर्टीत गुंतवणूक फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस न करता पूर्ण मेहनत घेतल्यास उत्तम यश मिळेल.

कुंभ: या आठवड्यात आहारात संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त मसालेदार, तळलेले किंवा बाहेरचे पदार्थ टाळा. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढे जा; बँकिंग, फायनान्स किंवा कागदोपत्री कामात चांगला फायदा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचे योग अनुकूल आहेत. प्रेमसंबंधात आकर्षण आणि जवळीक वाढेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदार आनंदी राहील. मात्र अहंकारामुळे छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतात. घरातील शांतता बिघडू शकते. आर्थिकदृष्ट्या प्रवास, सहली आणि दिखाव्यावर जास्त खर्च होऊ शकतो. लोन प्रक्रियेत काही विलंब संभवतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला; रिसर्च, प्रोजेक्ट किंवा उच्च अभ्यासासाठी संधी मिळू शकते.

मीन: या आठवड्यात वेळेवर उपचार आवश्यक. व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, पण प्रयत्न फळाला येतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर्स मिळू शकतात. प्रेमसंबंधात उत्साह, आत्मीयता वाढेल. वैवाहिक जीवन अतिशय सुखद; जोडीदाराचा भरपूर सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या शेअर मार्केट किंवा बँकिंगमार्फत गुंतवणूक लाभदायक ठरू शकते; लोनची प्रक्रिया जलद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने तयारी केल्यास चांगले यश मिळेल. एकूणच, जबाबदारी आणि मेहनत यामुळे आठवडा फलदायी ठरेल.
















