साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 09:13 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात शुक्र कर्क राशीत प्रवेश करील. अन्य कुठलाही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू आणि शुक्र मिथुन राशीत असून, दि. २० रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करील. तेथे त्याची युती बुधाशी होईल. रवि आणि केतु सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत आहेत. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह या राशींमधून राहील. या सप्ताहात दि. १८ रोजी शेवटचा श्रावणी सोमवार, दि. १९ रोजी शेवटची मंगळागौर व अजा एकादशी आहे. दि. २० रोजी प्रदोष, दि. २१ रोजी गुरुपुष्यामृत आहे. दि. २२ रोजी दर्श पिठोरी आमावस्या, पोळा आहे. 3 / 15एकूण ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी आगामी कालावधी कसा असेल? कोणत्या राशींना उत्तम फल, नोकरी-व्यापार, व्यवसायात लाभ प्राप्त होऊ शकतील, यश-प्रगती, उन्नती लाभू शकेल, ते जाणून घ्या...4 / 15मेष: हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांत काही कारणाने भांडण होऊन त्यांच्यात तणाव निर्माण होईल. विवाहितांच्या जीवनात गैरसमज झाल्याने एखादा वाद झाला तरी ते नाते दृढ करू शकतील. आर्थिक दृष्ट्या आठवडा खुश करणारा आहे. प्राप्तीचे स्रोत वाढल्याने खुश व्हाल. एखाद्या कामाच्या बाबतीत काही काळजी वाटत असली तर ती ह्या आठवड्यात दूर होईल. ह्या आठवड्यात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. हा आठवडा कारकिर्दीसाठी अनुकूल आहे. व्यापाऱ्यांनी ह्या आठवड्यात कोणाशीही व्यावसायिक भागीदारी करू नये. व्यावसायिक योजनांवर आपले लक्ष केंद्रित करावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती चांगल्या नोकरीच्या शोधात राहतील. सध्याच्या नोकरीतील वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होऊन पदोन्नतीची शिफारस करू शकतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात समस्या निर्माण झाल्याने ते त्रस्त होतील. त्यांची एकाग्रता भंग पावेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.5 / 15वृषभ: हा आठवडा साधारण चांगला आहे. ह्या आठवड्यात कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या गोष्टीने त्रासून गेला असाल तर ह्या आठवड्यात समस्या दूर होईल. विवाहितांचे संबंध दृढ होतील. एखादी चांगली बातमी ऐकावयास मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी जर काही समस्या असली तर ती ह्या आठवड्यात वरिष्ठांच्या मदतीने सहजपणे दूर होऊ शकेल. ह्या आठवड्यात थकबाकी मिळण्याची संभावना आहे. वाढीव खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासातील समस्या वरिष्ठांशी बोलून दूर करू शकतील. वेळ वाया दवडू नये. अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. 6 / 15मिथुन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक नाते दृढ कराल. आर्थिक बाबीत एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बाबतीत मात्र आपण सतर्क राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. ह्या आठवड्यात अध्ययनात काही समस्या येण्याची संभावना आहे. असे असले तरी तणावमुक्त होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल.7 / 15कर्क: ह्या आठवड्यात विचारपूर्वक सर्व कामे करावी लागतील. विवाहित व्यक्तींचे जीवन सुखद होईल. ते आपले नाते दृढ करतील. कामात जोडीदाराचे सहकार्य मिळाल्याने ते खुश होतील. ह्या आठवड्यात प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चाची चिंता त्रस्त करणार असल्याने खर्चाचा तपशील ठेवणे हितावह होईल. ह्या आठवड्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास नुकसान होण्याची संभावना आहे. कारकिर्दीतील समस्यांतून मुक्ती मिळेल. ह्या आठवड्यात सरकारी नोकरीसाठी तयारी करू शकता. विद्यार्थी विषयात बदल करून अभ्यासातील समस्या दूर करू शकतील. आहारावर लक्ष द्यावे लागेल.8 / 15सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असल्याचे जाणवेल. जीवनात जर एखादी समस्या असलीच तर ते सहजपणे ती दूर करू शकतील. ह्या आठवड्यात विचारपूर्वक खर्च कराल. व्यापाऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात काही प्रवास करावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. त्यांची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी जर त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित केले नाही तर त्यांच्या समस्या वाढण्याची संभावना आहे. त्यांना अभ्यासास प्राधान्य द्यावे लागेल. 9 / 15कन्या: हा आठवडा काही चिंता घेऊन येत आहे. प्रेमिकेच्या मनमानीपणामुळे प्रेमीजनांना थोडी चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनात जर सामंजस्य नसले तर नात्यात समस्या येऊ शकतात. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत सतर्क राहाल. एखाद्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची संभावना आहे. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष द्याल. कारकीर्द उसळी घेत असल्याचे जाणवेल. तरी जास्त मेहनत करावी लागेल. असे केल्यासच कारकीर्द उंचावू शकाल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अभ्यासात यश प्राप्ती होऊ शकते. त्यांना अध्ययनासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. हा आठवडा त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचे दिसेल.10 / 15तूळ: हा आठवडा उन्नतीदायक आहे. वैवाहिक जीवनात बाहेरील काही व्यक्तींमुळे निष्कारण समस्या निर्माण होऊ शकतात. कोणालाही आपल्या कौटुंबिक गोष्टी सांगू नये. हा आठवडा आर्थिक बाबींसाठी उत्तम आहे. जर गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होऊ शकतो. शेअर्स बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. ह्या आठवड्यात एखादे मोठे काम हाती घेऊ शकता. व्यापारात चढ-उतार येतील. काही समस्या ये-जा करून व्यापाराची आर्थिक घडी काहीशी कमकुवत करू शकतील. तेव्हा आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील. काही कामांच्या बाबतीत त्यांची धावपळ जास्त होईल. असे केल्यानेच त्यांची सर्व कामे सहजपणे ते पूर्ण करू शकतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची संभावना आहे. ते मन स्थिरावून अभ्यासास प्राधान्य देतील. बाहेरगावी जाऊन एखादा अभ्यासक्रम करणे हितावह होऊ शकेल. त्याने अपेक्षित यश मिळण्याची संभावना आहे.11 / 15वृश्चिक: हा आठवडा उत्तम फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा गोंधळ निर्माण झाल्याने काही समस्या येऊ शकतात. सामंजस्याने नाते टिकवून ठेवावे लागेल. असे काही करू नका, की ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकेल. हा आठवडा चांगला आर्थिक लाभ देणारा आहे. ह्या दरम्यान बुडालेले पैसे परत मिळण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणतीही चिंता राहणार नाही. नोकरी करणाऱ्यांची एक नव्याने ओळख निर्माण होईल. ते सहकाऱ्यांना मदत करतील. आत्मविश्वास उत्तम असल्याने कोणतेही काम करणे जड जाणार नाही. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात समस्या येऊ शकतात. तेव्हा त्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. त्यांनी कामे स्वतःच करावीत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. त्यांना आपले ज्ञान वाढविण्याची संधी मिळेल. ज्या विषयात त्यांना समस्या असेल तो विषय ते ह्या आठवड्यात बदलून घेऊ शकतात. ते त्यांच्या हिताचे होईल.12 / 15धनु: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात निष्कारण कोणत्याही वादात पडू नये. प्रेमीजनांनी प्रेमिकेवर विश्वास ठेवावा. नाते दृढ होईल. विवाहित व्यक्ती जोडीदाराची काळजी घेतील. वेळ देतील. दोघेही एकमेकांसमोर मनोगत व्यक्त करू शकतील. आर्थिक दृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी आहे. खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. एखाद्याशी पैश्यांशी संबंधित काही बोलणी केली असतील तर ती त्यांच्यासाठी समस्या होऊ शकते. विद्यार्थ्यांची एकाग्रता होत नसल्याने त्यांना अध्ययनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एखादा विषय बदलल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. तेव्हा यशस्वी होण्यासाठी समस्या वरिष्ठांना सांगण्याचा प्रयत्न करून लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. 13 / 15मकर: हा आठवडा गोंधळात टाकणारा आहे. प्रेमीजनांत काही गैरसमज वाढल्याने त्यांच्या नात्यात दुरावा येण्याच्या संभाव्यतेमुळे ते त्रासून जातील. विवाहितांना नाते आनंदमय असल्याचे जाणवेल. जुन्या समस्येतून त्यांची सुटका होईल. ह्या आठवड्यात आर्थिक चिंता त्रस्त करतील. ह्या आठवड्यात वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. धनप्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष ठेवावे लागेल. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. त्यांचे बुडालेले पैसे त्यांना मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील. वरिष्ठ प्रसन्न होऊन त्यांच्यावर काही नवीन जवाबदारी सोपवतील, ज्या ते आनंदाने पूर्णत्वास नेतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. इतर प्रवृत्तीत ते जास्त गुंतून जातील. तसेच मित्र लक्ष विचलित करतील. असे झाल्याने स्पर्धा परीक्षेत यश मिळणे अवघड होईल. 14 / 15कुंभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांत तणाव निर्माण झाल्याने नात्यात दुरावा येण्याची संभावना आहे. मनास एखादी गोष्ट जर खुपत असेल तर ती प्रेमिकेस सांगून त्याचे निराकरण करावे. विवाहितांनी त्यांच्या नात्यात अहंकारास थारा देऊ नये, अन्यथा आपल्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीत सतर्क राहावे लागेल. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक समस्येत भर पडू शकते. ह्या आठवड्यात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. व्यापाऱ्यांनी इतरत्र लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा. एखादा सल्ला घेण्याची आवश्यकता भासल्यास व्यावसायिक भागीदाराचा सल्ला घेणे उचित ठरेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने ते निराश होतील. असे असले तरी त्यांनी मेहनत करणे चालूच ठेवावे.15 / 15मीन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजन प्रेमिकेच्या प्रेमळ वागण्याने प्रसन्न होतील. त्यांना एकमेकांना समजून घेण्याची उत्तम संधी मिळेल. विवाहितांनी संभाव्य भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा त्याचा प्रभाव आपल्या मुलांवर होण्याची शक्यता आहे. मनमानीपणा सोडावा लागेल. ह्या आठवड्यात अपेक्षित धन प्राप्ती होईल. खर्चात कपात केली नाहीत तरी प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल. तेव्हा भविष्याचा विचार करून आर्थिक गुंतवणूक करावी. व्यापाऱ्यांना काही नवीन लोकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकेल. त्यांना बाहेरून काही ऑर्डर्स मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना थोडे सतर्क राहावे लागेल. नोकरीतील काही समस्यांमुळे नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील, त्याचे त्यांना अपेक्षित फळ मिळेल. ह्या दरम्यान ते एखाद्या सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतील. त्यांच्या ज्ञानात वृद्धी होईल. कोणतेही टेन्शन असल्यास एकटे राहू नका.