शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

साप्ताहिक राशीभविष्य:'या' राशींना अचानक धनलाभ; पण प्रवासात सावधान! वाहनाच्या वेगावर ठेवा नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:43 IST

1 / 15
या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतू सिंह राशीत आहे. मंगळ आणि प्लूटो मकर राशीत, रवी, बुध, शुक्र आणि राहू कुंभ राशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष या राशींमधून राहील.
2 / 15
मंगळवारी सकाळी ९:०६ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी पूर्ण काळ पंचक आहे. शनिवारी सायंकाळी ७:०७ वाजेपर्यंत पंचक राहील.
3 / 15
रविवारी महाशिवरात्र, सोमवारी अमावास्या, मंगळवारी दर्श अमावास्या, तर शनिवारी विनायकी चतुर्थी आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०५ वाजेपर्यंत माघ कृष्ण तृयोदशी आहे. सायंकाळी ७:४८ वाजेपर्यंत उत्तराषाढा, तर त्यानंतर श्रवण नक्षत्र राहील. रास मकर राहील. आज सामान्य दिवस आहे. महाशिवरात्र आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ यावेळेत राहील.
4 / 15
मेष - नवीन संधी मिळेल : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी व्यवसायात मोठी संधी मिळेल. तुमच्या समोर काही प्रस्ताव येतील. मात्र, त्यातील बारकावे समजून घ्या. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरी आणि वैयक्तिक कामे यांचा ताळमेळ बसवताना थोडी तारांबळ उडेल. मात्र, एकंदरीत फायदेशीर ग्रहमान राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुम्हाला आधार राहील. शुक्रवार, शनिवार आपण संयमाने वागण्याची गरज आहे. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
5 / 15
वृषभ -लाभदायक परिस्थिती : चंद्राचे भाग्य स्थानातून ते लाभ स्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. सुरुवातीपासूनच आघाडीवर राहाल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक मानसन्मान मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटनाच्या संधी मिळतील. एखादी चांगली बातमी कळेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. प्रेमात सफलता मिळेल. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
6 / 15
मिथुन- यशदायक काळ : यशदायक काळाचा अनुभव येईल. मात्र, रविवार, सोमवार आपण अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. मंगळवारपासून भाग्य स्थानातील चंद्र, शुक्र, बुध, रवी, राहू युतीचे अनुकूल परिणाम दिसून येतील. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. तो आपण यशस्वीपणे पूर्ण कराल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. पर्यटन घडेल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.
7 / 15
कर्क- प्रशंसा होईल : थोडी सावधगिरी बाळगल्यास हा सप्ताह तुम्हाला चांगला ठरेल. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. मंगळवार, बुधवार वाहन जपून चालवा. शारीरिक दुखापती होणार नाही याची काळजी घ्या. झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. शुक्रवारपासून नवीन संधी मिळतील. तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटेल. लोकांकडून प्रशंसा केली जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
8 / 15
सिंह- प्रेमात सफलता मिळेल : तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. विरोधकांच्या कारवाया हळूहळू थंडावतील. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. विवाहाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल वातावरण राहील. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. शुक्रवार, शनिवार वाहन जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या, इतरांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
9 / 15
कन्या- मुलांशी संवाद ठेवा : काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. जे स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांनी जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्यावे. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस.
10 / 15
तूळ- व्यस्त राहाल : पूर्वार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. त्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरात गैरसमजातून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेजारच्या लोकांशी गोडीत बोला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. सामाजिक मानसन्मान मिळेल. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. आपल्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे.टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
11 / 15
वृश्चिक - जवळचा प्रवास होईल : सुरुवातीला व्यवसायात आक्रमक धोरण राहील. मात्र, बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवास होतील. मंगळवारपासून नवीन प्रकल्पात गुंतलेले राहाल. त्यातून तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. महागड्या वस्तू खरेदी कराल. गृहसौख्य चांगले राहील. मुलांशी संवाद ठेवा. जीवनसाथीचा सहयोग राहील. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
12 / 15
धनू- व्यवसायात भरभराट होईल : सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. त्यामुळे शिल्लक अशी काही उरणार नाही. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. काहींना प्रवासाचा योग येईल. नातेवाईक व जवळच्या लोकांच्या समवेत सहलीला जाऊन याल. व्यवसायात भरभराट होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वास्तूशी संबंधित व्यवहार जपून करा किंवा थोडे पुढे ढकला. नोकरीत शेवटच्या टप्प्यात कामाचा ताण राहील. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
13 / 15
मकर- क्रोधाला आवर घाला : सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. क्रोधाला आवर घातला पाहिजे. नाही तर जवळचे लोक नाराज होतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. शुक्रवार, शनिवार महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही, तसेच मनस्तापही होणार नाही. श्रद्धा आणि सबुरी यावर विश्वास ठेवा. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
14 / 15
कुंभ- कायद्याची बंधने पाळा : व्यय स्थानातून होणाऱ्या चंद्र मंगळ युतीमुळे रविवार, सोमवार तुम्हाला अचानक खर्च करावा लागू शकतो. प्रवासात सतर्क राहा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. मंगळवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. मनात सकारात्मक विचार राहतील. कामाचा उत्साह वाढेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना थोडी काळजी घ्या. एखादी चांगली घटना घडेल. टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
15 / 15
मीन- धनलक्ष्मीची कृपा राहील : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. विरोध करणारे लोक तुमच्या समोर माघार घेतील. काहींना प्रवासाचा योग येईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मात्र, जवळच्या लोकांशी संवाद ठेवला पाहिजे. नाही तर गैरसमज होऊ शकतात. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMahashivratriमहाशिवरात्री