साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:52 IST2025-06-08T09:38:56+5:302025-06-08T09:52:48+5:30
Weekly Horoscope: ८ जून २०२५ ते १४ जून २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या आठवड्यात ग्रहस्थिती अशी आहे की, शुक्र मेषेत, रवि आणि हर्षल वृषभेत, गुरू आणि बुध मिथुन राशीत, मंगळ आणि केतु सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभेत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशींमधून राहील.
रविवारी प्रदोष, सोमवारी शिवराज शक ३५२ ची सुरुवात, मंगळवारी वटपौर्णिमा, गुरुवारी कर्नाटकी बेंदूर तर शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. बुध आणि गुरु यांच्या युतीमुळे शुभ योग जुळून येत आहेत. तर मंगळ आणि केतु यांच्या युतीमुळे प्रतिकूल योग जुळून येत आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींसाठी हा आठवडा चांगला जाऊ शकेल, तर कोणत्या राशींनी या आठवड्यात काय काळजी घ्यावी, काय करू नये? जाणून घेऊया...
मेष: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आरोग्याच्या समस्या त्रस्त करू शकतात. ह्या आठवड्यात व्यापारी वर्ग अति आत्मविश्वासात राहून एखादी समस्या ओढवून घेण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात नोकरीत बदल करू शकतात. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. विद्यार्थ्यांची चिडचिड वाढल्याने अभ्यासात लक्ष लागणार नाही. प्रेमीजनांनी अहंकार बाजूस ठेवावा, अन्यथा त्यांच्यात दुरावा येऊ शकतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण राहण्याची संभावना आहे.
वृषभ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आठवड्याची सुरवात मित्रांच्या सहवासात राहून आपण करू शकाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जास्त श्रम करावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री मेहनत वाढवावी लागू शकते. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अजून वाट पाहावी लागेल. जर एखादी व्यक्ती आवडली असेल तर तिला मनातील भावना सांगू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात.
मिथुन: ह्या आठवड्यात प्रकृती चांगली राहील. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चात कपात होऊन प्राप्तीत वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाप्रती एखादा भ्रम असू शकतो.
कर्क: ह्या आठवड्यात प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. घरी विशेष काही करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात करू शकाल. असे केल्याने वैवाहिक जोडीदार खुश होईल. व्यापाऱ्यांना जर त्यांच्या व्यवसायात काही बदल करावयाचा असेल तर त्यांनी तो ह्या आठवड्यात करू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामगिरीच्या प्रशंसेसह पगारवाढ होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थितीत काही बदल होत असल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अध्ययन केल्यास त्यांना चांगले यश मिळू शकते.
सिंह: हा आठवडा चांगला आहे. बाहेरील पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडू शकते. प्रेमीजनांच्या जीवनात काही कारणाने दुरावा येऊ शकतो. दांपत्य जीवनात वाद होत असल्याचे दिसून येईल. जर शेअर्स बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर तज्ज्ञ व्यक्तीशी सल्ला मसलत केल्याशिवाय करू नये. विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादा व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी ह्या आठवड्यात कर्ज घेऊ शकता. व्यापारासाठी मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात यश प्राप्त होऊ शकते. जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे.
कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात कुटुंबियांच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवू शकाल. व्यापारात एखादा चांगला सौदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा संघर्षग्रस्त आहे. असे असले तरी त्यांना प्रगतीची संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात प्राप्तीत वाढ होऊ शकते. त्याच बरोबर खर्चात जास्त वाढ संभवते.
तूळ: व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापाराच्या बाबतीत आत्मविश्वास राहील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांत काही कारणाने भांडण झाल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे जाणवेल. त्यामुळे वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती डळमळीत असेल. एखादे आर्थिक नुकसान संभवते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते.
वृश्चिक: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. व्यवसायाशी संबंधित आपले एखादे सरकारी काम स्थगित झाले असल्यास ते ह्या आठवड्यात वेळेवर पूर्ण होऊ शकते. नोकरीत बदल संभवत असल्याने वाणीवर संयम ठेवावा. प्रेमिकेसह काही सुखद क्षण घालवू शकाल. ह्या आठवड्यात जलद गतीने प्राप्ती वाढू शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता आहे. एखाद्या भ्रमात राहण्याची संभावना असून त्यामुळे त्रस्त होऊ शकता.
धनु: ह्या आठवड्यात तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे योगासन व व्यायाम अवश्य करावा. व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक मदत मिळू शकेल. प्रेमीजनांच्या जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कटुता येण्याची संभावना आहे. विवाहितांसाठी आठवडा अनुकूल आहे. जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. ह्या आठवड्यात घराच्या नूतनीकरणासाठी खूपच जास्त पैसा खर्च करण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात अचानकपणे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासाकडे वळेल व त्यामुळे अध्ययनात काही त्रास होऊ शकतो.
मकर: ह्या आठवड्यात प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. ध्यान - धारणा करावी. प्रेमीजनांनी त्यांच्या प्रेमिकेशी संबंध दृढ करावेत. व्यापारी जर त्यांच्या व्यापारासाठी काही आर्थिक गुंतवणूक करू इच्छित असतील तर ते तसे करू शकतील. ह्या आठवड्यात वाद - विवादात जास्त पैसा खर्च होण्याची संभावना आहे. ह्या व्यतिरिक्त घरगुती गरजा भागविण्यासाठी जास्त पैसा खर्च करू शकता. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अनेक अडचणी येऊ शकतात. बाहेर फिरण्यात मौल्यवान वेळ वाया घालवाल. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकणार नाही.
कुंभ: ह्या आठवड्यात आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. जर नव्याने एखादा व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर त्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीची प्रशंसा कार्यक्षेत्री होऊ शकते. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सावध राहावे. विवाहितांनी त्यांच्या शंका दूर कराव्या, अन्यथा कुटुंबात खूप मोठा वाद होऊ शकतो. विलासी जीवन जगण्यासाठी खूप खर्च करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे त्यांना जास्त मेहनत करावी लागेल.
मीन: ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाण्याकडे आपण आकर्षित होण्याची शक्यता असून त्याने प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. विवाहितांसाठी आठवडा अनुकूल आहे. हिंडण्या-फिरण्यात बराचसा पैसा खर्च होऊ शकतो. शेअर्स बाजारात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. ह्या आठवड्यात विद्यार्थी त्यांच्या अध्ययनाकडे जास्त लक्ष देऊ शकतील. त्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळू शकतात. कारकीर्द घडविण्यासाठी जास्त श्रम करावे लागू शकतात.