साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 08:30 IST2025-11-02T08:19:35+5:302025-11-02T08:30:34+5:30

Weekly Horoscope: ०२ नोव्हेंबर २०२५ ते ०८ नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात सुरुवातीलाच म्हणजे रविवारी शुक्र तूळ राशीत प्रवेश करील. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत आहे. शुक्र कन्या राशीत असून, रविवारी दुपारी १:१५ वाजता तो तूळ राशीत जाईल. तेथे त्याची युती रवीशी होईल. मंगळ आणि बुध वृश्चिक राशीत आहेत. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन या राशींमधून राहील. या सप्ताहात रविवारी भागवत एकादशी (कार्तिकी एकादशी) आहे. सोमवारी प्रदोष, मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी, बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा, गुरू नानक जयंती, कार्तिक स्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती आहे. शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. रविवार व सोमवारी पूर्ण काळ पंचक आहे. मंगळवारी दुपारी १२:३५ वाजेपर्यंत पंचक राहील.

आगामी आठवडा अनेकार्थाने विशेष आहे. शुक्राचे गोचर, तुलसीविवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी आहे. याचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? शुक्रादित्य राजयोगाचा परिणाम कसा प्राप्त होऊ शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा प्रेमीजनांना खुश करणारा आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीची काळजी करावी लागणार नाही. असे असले तरी आपण आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे. तसेच एखाद्या चांगल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा. प्राप्तीत वाढ झाली तरी काही खर्च त्रस्त करतील. टेन्शन काहीसे वाढू शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा संघर्ष करण्याचा आहे. कोणाचे ऐकून निर्णय घेतल्यास त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नतीसह पगारवाढ होऊ शकते. त्यामुळे ते खुश होतील. ह्या आठवड्यात ते वरिष्ठांना प्रसन्न करतील. विद्यार्थी अध्ययनावर पूर्ण लक्ष देऊन यशस्वी होतील. परंतु काही कामे असे असतील की ज्यामुळे त्यांचे मन विचलित होऊ शकते. तेव्हा त्यांनी थोडे सावध राहावे.

वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांना प्रेमिकेच्या सहवासात राहण्यास आवडेल. ह्या आठवड्यात खर्च वाढतील. दिखाऊपणाच्या नादात जास्त खर्च करू शकता. कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक गुंतवणूक करू नये. विचारपूर्वकच ती करावी. अन्यथा नुकसान होऊ शकते. ह्या आठवड्यात कारकिर्दीत मेहनत वाढविलीत तरच यशस्वी होऊ शकाल. एखादा स्थगित झालेला व्यापारी सौदा ह्या आठवड्यात पूर्णत्वास जाईल. योजना फलद्रुप होतील. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांना थोडे सतर्क राहावे लागेल. विद्यार्थी जोशात आपले अध्ययन करतील. एखाद्या नोकरीशी संबंधित स्पर्धेसाठी जास्त मेहनत करावी लागेल. सध्या सामाजिक माध्यम व मित्रांपासून थोडे दूर राहणे हितावह होईल.

मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांचे जीवन खुशीने भरलेले राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या गोष्टींमुळे समस्या वाढतील. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत प्रसन्न राहाल. भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक करण्याची योजना आखा. प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे हितावह होईल. एखादे नवीन घर खरेदी करू शकता. ह्या आठवड्यात कारकीर्द चांगली राहील. मार्केटिंग करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी लाभदायी आहे. त्यांना एखाद्या जुन्या नोकरीच्या ठिकाणाहून ऑफर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्राप्तीत वाढ होऊ शकेल. ह्या आठवड्यात विद्यार्थी तणावग्रस्त राहतील. त्यांचे मन त्रस्त होईल. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी झाले तरी अति आत्मविश्वासामुळे त्यांचे नुकसानच होईल.

कर्क: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती उत्तम असेल. घर सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. ह्या आठवड्यात काही महागड्या वस्तूंची खरेदी करू शकाल. त्यामुळे खर्चात वाढ होईल. कारकिर्दीत कामगिरी उत्तम होईल. एखादे स्थगित झालेले काम सुरू होऊ शकते. व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगला चालेल. नोकरीत पदोन्नती संभवते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थी मेहनतीने चांगले उद्दिष्ट गाठू शकतील. परंतु त्यांना अभ्यासासाठी आवश्यक तितका वेळ काढावा लागेल. मित्र वेळ वाया दवडण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांच्यापासून थोडे लांब राहावे. ज्ञानात भर पडेल.

सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. एखादी जुनी प्रेमिका परतण्याची शक्यता आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. एखाद्या मित्राच्या सांगण्या वरून शेअर्स बाजारात गुंतवणूक करू नये. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे हितावह होईल. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष दिल्यास उत्तम. नोकरीत अपेक्षित यश प्राप्त होईल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. व्यावसायिकांना ह्या आठवड्यात एखादा नवीन प्रकल्प मिळण्याची संभावना आहे. सहकारी मदत करू शकतील. काही नवीन कंत्राट व्यवसायाचा विस्तार विदेशात सुद्धा करू शकतील. विद्यार्थी ह्या आठवड्यात तणावग्रस्त राहतील. त्यांच्या अध्ययनात काही अडथळे येतील. एखाद्या नवीन अभ्यासक्रमाप्रति रुची जागृत होऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.

कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना प्रेमिकेसाठी वेळ काढावा लागेल. कौटुंबिक टेन्शनचा प्रभाव वैवाहिक जीवनावर होईल. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. परंतु मौज-मजा व हिंडण्या-फिरण्यावर भरपूर पैसा खर्च कराल. जर कोणाला वायदा केला असेल तर तो पूर्ण कराल. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला आहे. ते एखादे नवीन काम सुरू करू शकतात. नोकरी करणाऱ्यांना सभोवतालच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल. ते कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. त्यांना आत्मविश्वास वाढवावा लागेल. एखादा नवीन अभ्यासक्रम करावयाचा असेल तर ते त्यासाठी प्रवेश मिळवू शकतात.

तूळ: हा आठवडा समस्याग्रस्त आहे. ह्या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम असेल. वैवाहिक जोडीदारासाठी काही वस्तूंची खरेदी करू शकाल. कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तो ह्या आठवड्यात मंजूर होईल. कारकिर्दीसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती होईल. भागीदारी व्यवसाय उत्तम चालला तरी भागीदार दगा देण्याची संभावना आहे. नोकरीत कोणतेही काम घाईघाईत करू नये. कामात काही समस्या निर्माण झाली तर वरिष्ठांशी चर्चा करून ती दूर करावी. विद्यार्थी अध्ययन मेहनत करून पूर्ण करू शकतील. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. त्यांना मित्रांशी खूपच विचारपूर्वक संवाद साधावा लागेल.

वृश्चिक: ह्या आठवड्यात सतर्क राहावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकाल. व्यापारासाठी जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता. एखादी समस्या असल्यास ती सहजपणे दूर करू शकाल. आर्थिक स्थिती नाजूक राहील. तेव्हा थोडे सावध राहावे. कोणाच्या सांगण्यावरून काही करू नये. एखादे काम पैशामुळे खोळंबले असेल तर ते ह्या आठवड्यात पूर्ण होईल. प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. कारकिर्दीत चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामगिरीने वरिष्ठांना खुश करतील. त्यांना आवडीचे काम मिळाल्याने ते खुश होतील. विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन अध्ययन करण्याची इच्छा होईल, परंतु त्यात विघ्न येईल. कौटुंबिक समस्यांचा प्रभाव अध्ययनावर होईल. मात्र काही बदल केल्यास त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होईल.

धनु: हा आठवडा कष्टदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीचे टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही. कोणतेही काम घाईघाईत करू नये. कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामात चूक होण्याची संभावना आहे. तेव्हा कोणतेही काम जोशात करू नये. विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. कोणाशी वचनबद्ध होऊ नये. शासकीय नोकरीची तयारी करत असणाऱ्या व्यक्तींनी आपली मेहनत चालूच ठेवावी. त्यांना चांगले यश मिळू शकते. पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाकडे लक्ष द्यावे. कुटुंबात काही समस्या असल्यास त्याचा प्रभाव अध्ययनावर होऊ देऊ नका. जर एखाद्या गोष्टीची काळजी करत असाल तर ती ह्या आठवड्यात दूर होत असल्याचे दिसत आहे.

मकर: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. असे असले तरी कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न कराल. निष्कारण एखाद्या आर्थिक योजनेकडे लक्ष देऊ नका. काही शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कारकिर्दीत थोडे सावध राहावे लागेल. एखादा मोठा प्रकल्प मिळेल, परंतु घाई केल्याने त्यात काही चुका होऊ शकतात. नोकरीतील कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणाच्या सांगण्याकडे लक्ष देऊ नये. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्ययन करावे लागेल. लक्ष विचलित झाल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. इतर कामांना वेळ देण्याऐवजी अध्ययनास प्राधान्य द्यावे. आहारावर लक्ष द्यावे.

कुंभ: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात थकबाकी मिळण्याची संभावना आहे. त्याच बरोबर जर कोणाला कबूल केले असल्यास त्यास पैसे द्यावे लागतील. जमिनीशी संबंधित एखादा वाद असेल तर तो ह्या आठवड्यात संपुष्टात येऊ शकतो. व्यापारात चांगले यश मिळण्याची संभावना आहे. कारकीर्द उत्तम चालेल. प्रगती होईल. नोकरी बदलली तर ती हिताचीच असेल. कामगिरीने वरिष्ठ प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. एखाद्या शासकीय स्पर्धेत सहभागी होऊ शकता. कोणत्याही कामात घाई करू नये. ह्या आठवड्यात दिनचर्येत सुधारणा करावी लागेल. कामाच्या बरोबरीने विश्रांतीसाठी वेळ काढू शकाल.

मीन: हा आठवडा खुशीने भरलेला असेल. जोडीदाराशी सल्ला-मसलत करून काम करणे हिताचे होईल. ह्या आठवड्यात खर्चांमुळे त्रासून जाल. व्यापारात नावाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगती झाल्याने खुश व्हाल. कारकिर्दीत नवीन संधी मिळण्याची संभावना आहे. जुने संपर्क पुढे घेऊन जातील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकेल. पदोन्नतीसह काही प्रशिक्षण घ्यावे लागेल, जे हिताचे असेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. काही समस्या असल्यास गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे. एखाद्या स्पर्धेत स्वारस्य दाखवाल. ज्ञानवृद्धीचा प्रयत्न करू शकता. अतिरिक्त काम केल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये.