वास्तूशात्रानुसार स्वयंपाकघर बांधताना घ्यावी 'ही' काळजी, अन्यथा होतील वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:10 IST2022-08-21T18:03:30+5:302022-08-21T18:10:42+5:30
किचनमध्ये आवश्यक वास्तु नियमांचे पालन केले नाही तर घराच्या मालकाच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना वास्तूची काळजी घेतली पाहिजे.

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. महिलांचा दिवसाचा बहुतांश वेळ इथेच जातो.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला बनवू नये.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर बनवू नका. यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते.
वरती सांगितल्यानुसार स्वयंपाकघर नैऋत्य दिशेलाही बनवू नये. त्यामुळे मालकाला अडचणींचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात स्टोव्ह, शेगडी नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे मनःशांती मिळते.
किचनमध्ये फ्रीज, मिक्सर ग्राइंडर या जड वस्तू दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवाव्यात.
स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व दिशेला असाव्यात. यासोबत क्रॉस व्हेंटिलेशनची पुरेशी व्यवस्था असावी.
वॉश बेसिन किचनच्या उत्तरेला असावे.
पिण्याचे पाणी नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे.