शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Valentines Week 2026: तुमच्या हातावरील 'या' रेषेत दडलंय सुखी संसाराचं गुपित; पाहा काय सांगते तुमची Palmistry

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:24 IST

1 / 5
व्हॅलेंटाईन वीक सुरू असताना प्रत्येक मनामध्ये एकच प्रश्न असतो— 'माझ्या आयुष्यात प्रेम कधी येईल?' किंवा 'माझं वैवाहिक आयुष्य कसं असेल?'. या प्रश्नांची उत्तरं तुमच्या हाताच्या रेषांमध्ये दडलेली असतात. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार (Palmistry), हातावरील 'हृदय रेषा' आणि 'विवाह रेषा' तुमच्या प्रेमजीवनाचा आरसा असतात. त्या तुमच्या वैवाहिक सुखाबद्दल काय सांगतात, ते जाणून घेऊ.
2 / 5
तुमच्या करंगळीच्या खालून सुरू होऊन तर्जनी किंवा मध्यमा बोटाकडे जाणारी रेषा म्हणजे हृदय रेषा. जर ही रेषा स्पष्ट आणि लांब असेल, तर ती व्यक्ती प्रेमात अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान असते. अशा व्यक्तींना त्यांच्या आवडीचा आणि आदर्श जोडीदार मिळतो. त्यांचे वैवाहिक जीवन समाधानी असते. हृदय रेषेच्या शेवटी जर दोन फाटे (V-shape) असतील, तर याला 'विष्णू चिन्ह' म्हणतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यात नशिबाने प्रेम येते आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप भाग्यवान असते.
3 / 5
करंगळीच्या अगदी खाली आणि हृदय रेषेच्या वर असलेल्या लहान आडव्या रेषांना विवाह रेषा म्हणतात. जर फक्त एकच स्पष्ट आणि गडद रेषा असेल, तर ते दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सुखी वैवाहिक जीवनाचे लक्षण आहे. जर ही रेषा थोडी वरच्या बाजूला झुकलेली असेल, तर जोडीदार श्रीमंत किंवा प्रभावशाली मिळतो. अशा व्यक्तींच्या आयुष्यात दोन व्यक्तींचे प्रेम असू शकते किंवा विवाहापूर्वी एखादे गंभीर नाते असू शकते.
4 / 5
अंगठ्याच्या खालील फुगीर भागाला 'शुक्र पर्वत' म्हणतात. हस्तसामुद्रिक शास्त्रात शुक्र हा प्रेम आणि विलासाचा कारक आहे. जर हा भाग गुलाबी आणि उंच असेल, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते. अशा व्यक्तींना प्रेमात कधीही कमतरता भासत नाही. यावर 'जाळी' किंवा 'क्रॉस' असल्यास प्रेमसंबंधात काही काळ अडचणी येऊ शकतात, मात्र योग्य प्रयत्नांनी त्यात सुधारणा होते.
5 / 5
तर्जनी बोटाच्या खाली (गुरु पर्वतावर) जर स्पष्ट 'X' किंवा क्रॉसचे चिन्ह असेल, तर ते सुखी वैवाहिक जीवनाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. अशा व्यक्तींना समजून घेणारा आणि प्रेमळ जोडीदार मिळतो.
टॅग्स :Palmistryहस्तरेषाशास्त्रValentine Weekव्हॅलेंटाईन वीकrelationshipरिलेशनशिपmarriageलग्नValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे