By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:26 IST
1 / 10तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे, त्या अंकांची बेरीज म्हणजे तुमचा मूलांक. उदा. जर तुमचा जन्म १५ तारखेला झाला असेल, तर १+५ = ६. तुमचा मूलांक ६ आहे. आता मूलांकाप्रमाणे उपाय जाणून घेऊ. 2 / 10तुमचा स्वामी सूर्य आहे. मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी दर रविवारी सूर्यदेवाला कुंकू मिश्रित पाण्याचे अर्घ्य अर्पण करा. लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा. लाल रंग तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करेल. 3 / 10तुमचा स्वामी चंद्र आहे. प्रेमसंबंधात स्थिरता येण्यासाठी दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन महादेवाला पांढरी फुले आणि दूध अर्पण करा. विवाह लवकर ठरावा, जोडीदार लवकर मिळावा म्हणून प्रार्थना करा. 4 / 10तुमचा स्वामी गुरु आहे. योग्य जोडीदाराच्या शोधासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि भगवान विष्णूंना केशर-दुधाचा अभिषेक करा. आपल्यालाही लक्ष्मीसारखी पत्नी किंवा विष्णूसारखा पती मिळावा म्हणून प्रार्थना करा. 5 / 10तुमचा स्वामी राहू आहे. नात्यातील अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. बाप्पा तुमच्या प्रेमजीवनातील अडथळे दूर करून तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात आणण्यास मदत करेल. 6 / 10तुमचा स्वामी बुध आहे. मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. शक्य असल्यास पाचूचे रत्न किंवा केशरी धागा हातात बांधा. यामुळे आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन तुमचे प्रेमजीवन बहरण्यास मदत होईल. 7 / 10तुमचा स्वामी शुक्र आहे, जो प्रेमाचा कारक मानला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या आधी शुक्रवारी गरजू महिलांना वस्त्राचे दान करा आणि दैनंदिन आयुष्यात सुगंधाला प्राधान्य द्या, पर्फ्युम, अत्तर, उदबत्ती, उद, धूप वापरा. 8 / 10तुमचा स्वामी केतू आहे. प्रेमविवाहातील अडचणी दूर करण्यासाठी भगवान नरसिंहाची उपासना करा आणि पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. यामुळे तुमचे पितृदोष दूर होऊन संसार सुखाकडे वाटचाल होईल. 9 / 10तुमचा स्वामी शनी आहे. नात्यात येणारा विलंब टाळण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनी स्वामी असल्यामुळे हळू हळू कामे वेग घेतील आणि चांगल्या कार्यातील अडथळे दूर होतील. 10 / 10तुमचा स्वामी मंगळ आहे. ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी आणि चांगला जोडीदार मिळवण्यासाठी हनुमान चालीसा वाचा आणि मंगळवारी लाल मसूर डाळ दान करा. यामुळे तुम्हाला जोडीदार शांत स्वभावाचा मिळेल.