५० वर्षांनी त्रिग्रही योग: ६ राशींना २ राजयोगांचा लाभ, उत्पन्न वाढ; उत्तम संधी, नफाच नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:34 AM2024-04-12T07:34:07+5:302024-04-12T07:34:07+5:30

मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्रिग्रही आणि राजयोगांचा कोणत्या राशींवर कसा अनुकूल प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या...

एप्रिल महिना अनेकार्थाने विशेष आणि महत्त्वाचा ठरत आहे. या महिन्यातील ग्रहांच्या गोचरामुळे उत्तमोत्तम योग जुळून येत आहेत. सूर्य, शुक्र आणि बुध या तीन ग्रहांच्या संयोगामुळे २ राजयोग जुळून आले आहेत.

मीन राशीत बुध वक्री चलनाने विराजमान झाला आहे. मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच बुधाच्या या गोचरामुळे मीन राशीत त्रिग्रही योग जुळून आला आहे. मीन राशीत बुध आणि सूर्य विराजमान आहेत. बुध आणि सूर्याचा बुधादित्य राजयोग, तर शुक्र आणि बुधाचा लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे.

सूर्य, बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ५० वर्षांनी मीन राशीत असे योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. या ग्रहांच्या शुभ योगांचा ६ राशींना फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. त्या ६ भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घ्या...

मिथुन: व्यवसाय आणि नोकरीत चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. चांगले दिवस सुरू होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकाल. कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील.

सिंह: धार्मिक कार्यात रुची वाढेल. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. भौतिक सुखसोयी वाढू शकतील. समाजात मान-सन्मान वाढेल.

कन्या: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मालमत्तेशी संबंधित वादातून दिलासा मिळू शकेल. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.

धनु: विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतील. विवाहेच्छुकांचा विवाह निश्चित होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील. घरामध्ये शुभ कार्ये आयोजित करता येतील. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होऊ शकेल.

कुंभ: करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळेल. गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी मिळू शकते. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. प्रभावशाली लोकांशी संवाद वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

मीन: त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. नोकरीच्या अनेक चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत वाढतील. समाजात मान-सन्मान वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.