Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:52 IST2026-04-04T10:41:23+5:302026-04-04T10:52:33+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार ५ एप्रिल ते ११ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. यात पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार दिलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात प्रगती होईल. या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात करायची असेल तर करा. काम होण्याची शक्यता आहे पण ते पूर्ण होण्यासाठी संयम ठेवा!

हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचणार आहात. मागे केलेल्या कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. प्रवास संभवतात. नोकरी व्यवसायात अपेक्षित घटना घडायला वेळ लागेल. या आठवड्यात तुम्हाला धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा.

हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काम पूर्णत्वास जाऊ शकते. अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अडथळे दूर होतील, त्यांना पार करण्याची शक्ती तुमच्याकडे असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आवाज लोकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. परिस्थितीशी दोन हात करा. आत्मविश्वास ठेवा फक्त त्याचा अतिरेक नको! पुढे होऊन नेतृत्व करा. बदल घडण्याची वाट बघू नका, तो स्वतः घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा!

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, शक्ती आणि सामर्थ्य देणारा आहे. आत्मविश्वास चांगला राहील, इच्छाशक्ती भक्कम राहील. कोणतीही समस्या सोडवायला तुम्हाला योग्य मार्ग सुचतील. या आठवड्यात तुम्ही काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अतिवापर करू नका. भावनांमध्ये अडकू नका. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी लवचिक आणि चपळ रहा. "जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" हे लक्षात ठेवून स्वावलंबी व्हा!

हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या आठवड्यात तुम्ही नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.

हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. एखादा लाभ नक्की होईल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा!

हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. या आठवड्यात तुम्हाला मुंगी होऊन साखर खाण्याची गरज आहे. सगळ्यांना मदत करा, दुसऱ्याचे एखादे काम स्वतःहून करा! "चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं" या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन चैतन्य घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. ताजे टवटवीत वाटेल! या आठवड्यात तुम्ही इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा. एखाद्या कलेत वेळ घालवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर संधीचे सोने होईल!

हा सप्ताह तुमच्यासाठी धड इकडे नाही आणि तिकडे ही नाही अशी परिस्थिती निर्माण करणारा आहे. दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात. या आठवड्यात तुम्ही आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. दडपण न घेता "यालाच जीवन ऐसे नाव" समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता. ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com