Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:06 IST2026-04-11T13:00:00+5:302026-04-11T13:06:09+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. यात पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार दिलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. एखादी भेटवस्तू मिळेल. या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. घरातल्यांसोबत निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. मन जिंकून जग जिंका.

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. महत्त्वाचे कोर्टाचे काम होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांचे व्यवहार घडतील. काम पटकन होणार नाही. एका गोष्टीसाठी अनेक गोष्टींची गरज लागेल. या आठवड्यात तुम्ही सारासार विचार करुन वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन काम करा. सचोटीने वागा. काही चुका झाल्या असतील तर त्या खऱ्या मनाने मान्य करुन परिस्थिती स्वीकारा!

हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दीपेक्षा भावनांचा पगडा राहील. लोकांचे सहकार्य लाभेल. प्रवासयोग संभवतात. नातेसंबंध जोडले जातील. दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. या आठवड्यात इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका.

हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. लहान ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंद राहील, एकोपा राहील. ज्येष्ठ व्यक्ती किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. चिकाटीने पुढे चाला. आपल्या माणसांवर किंवा आवडीच्या वस्तूवर पैसे खर्च करा, त्यात काही चूक नाही, फक्त अतिरेक नको!

हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडथळे आणि अडचणी घेऊन येत आहे. हव्या तशा वेगाने कामे पुढे सरकणार नाहीत. पण असं असूनही तुम्हाला त्याचा फार त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करुन चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकणार आहात. या आठवड्यात तुम्ही एक नवीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आलेली अवघड परिस्थिती तुम्हाला नक्की शिकवायला आणि समृद्ध करायला आली आहे असा सकारात्मक विचार ठेवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. संयम आणि धैर्य ठेवा.

हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्यासाठी अजून वेळ लागेल. या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. स्वप्नरंजन करत बसू नका!

हा सप्ताह तुमच्यासाठी देवाण घेवाण करणारा असणार आहे. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. अडकलेल्या कामात काही प्रमाणत पुढे जाऊ शकता. आहे ती परिस्थिती सुधारेल, एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. एखादे बक्षीस मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा.

हा सप्ताह तुमच्यासाठी एका महत्त्वाच्या कलाटणीचा असणार आहे. तुमच्या मनाप्रमाणे नसलेले बदल घडतील आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. पण असं असूनही घाबरु नका, हे बदल सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत. "बदल हा निसर्गाचा नियम आहे" हे विसरू नका! या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी झगडायला जाऊ नका. उद्याचा सूर्य उगवण्यासाठी आजची रात्र सरावी लागते!

हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यांतराचा आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबून रहाल. पण चुकीचे वळण घेण्यापेक्षा आहे तिथे थांबणे योग्य! या आठवड्यात तुम्हाला काही प्रमाणात विश्रांती घेण्याची गरज आहे. दडपण घेऊ नका. अतिविचार टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. ध्यान मेडिटेशनचा तुम्हाला चांगला फायदा होईल!