सूर्य-शुक्र-केतु युतीवर राहुची नजर: ७ राशींना शुभ, बँक बॅलन्स वाढ; अनपेक्षित धनलाभ, अपार यश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:00 IST2024-09-05T15:00:03+5:302024-09-05T15:00:03+5:30
सुमारे १८ वर्षांनी असा योग जुळून येत असून, याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा, नफा, सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर नवग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत प्रवेश करत आहे. विद्यमान स्थितीत कन्या राशीत शुक्र आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य, शुक्र आणि केतु यांचा त्रिग्रही योग कन्या राशीत जुळून येणार आहे.

एखाद्या राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य सुमारे महिनाभर विराजमान असतो. कन्या राशीतील सूर्याच्या संक्रमणाला कन्या संक्रांती म्हटले जाईल. सुमारे १८ वर्षांनंतर सूर्य आणि केतु, शुक्राचा युती योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यामुळे सूर्य आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून येत असून, शुक्र, सूर्य आणि केतु या तीन ग्रहांच्या त्रिग्रही युतीवर राहुची नजर असमार आहे.

सूर्याच्या राशी संक्रमणामुळे जुळून आलेल्या या योगांचा आणि राहुच्या दृष्टीचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकणार आहे. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर अपार लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: सूर्य, शुक्र आणि केतु युती लाभदायक ठरू शकते. उत्पन्न वाढू शकते. नोकरदार लोकांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. गुंतवणुकीचा फायदा मिळू शकेल.

सिंह: सूर्य, शुक्र आणि केतु युती अनुकूल सिद्ध होऊ शकते. वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. चिंता दूर होतील. अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. उत्तम कल्पनांसह व्यवसायात चांगला नफा मिळवू शकाल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. विद्यार्थी पुन्हा पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकतील. संवाद सुधारेल. लोक प्रभावित होतील. मनोकामना पूर्ण होतील. योजना यशस्वी होतील.

कन्या: त्रिग्रही योग आणि राहुची नजर लाभप्रद सिद्ध होऊ शकते. व्यक्तिमत्त्व सुधारू शकते. सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात सन्मान वाढेल. पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अभ्यासातील समस्यांपासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक कामे पूर्ण होऊ शकतील.

तूळ: विशेष लाभ होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ शकाल. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक: शुक्र आणि केतु युती शुभ ठरू शकते. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल.

धनु: करिअर क्षेत्रात लाभ होऊ शकतो. अचानक बढती मिळू शकते किंवा उत्पन्न वाढू शकते. कमाईचे एकापेक्षा जास्त स्त्रोत मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय केला तर त्याचा विस्तार होऊ शकतो. धार्मिक कार्यातही रस असेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल. लोक वर्तनाने प्रभावित होतील. घर आणि कुटुंबातील वातावरण चांगले राहील. मानसिक शांतता अनुभवता येऊ शकेल.

मकर: लाभासह फायदा मिळू शकतो. नशिबाची साथ लाभू शकेल. हा काळ पैसा, करिअर आणि बँक बॅलन्सच्या बाबतीत चांगला आणि सकारात्मक असू शकतो. देश-विदेशातही प्रवास करू शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जोडीदारासोबत सुसंवाद चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















