शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Surya Budh Yuti in Cancer: सूर्य-बुधाच्या युतीने तयार झालाय वर्गोत्तम बुधादित्य योग; 'या' 4 राशीचे लोक अचानक होणार मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:00 IST

1 / 6
गेल्या 16 जुलैला सूर्य ग्रह परिवर्तन करून कर्क राशीत गेला आहे. याच बरोबर याच रात्री बुधानेही कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्‍योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि बुधाच्या युतीने एक जबरदस्त वर्गोत्तम बुधादित्य योग तयार केला आहे.
2 / 6
कर्क राशीमध्ये बुध आणि सूर्याची युती झाल्याने वर्गोत्तम बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग 4 राशींच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बुध 31 जुलैपर्यंत कर्क राशीत राहणार आहे, तोवर या चार राशींच्या लोकांना जबरदस्त फायदा होईल.
3 / 6
मेष रास - वर्गोत्तम बुधादित्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी वाहन-मालमत्ता खरेदीचा योग बनवत आहे. याशिवाय, या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. धनलाभ होईल. काही तरी असे काम होईल, ज्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद मिळेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील.
4 / 6
कर्क रास - वर्गोत्तम बुधादित्य राजयोग कर्क राशीच्या लोकांना भरपूर धन लाभ करवून देणार, या लोकांना अचानक पैसा मिळेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीबाची साथ मिळेल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल, त्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. धैर्य वाढेल.
5 / 6
कन्या रास - सूर्य-बुधाच्या युतीमुळे निर्माण झालेला वर्गोत्तम बुधादित्य राजयोग, कन्या राशीच्या लोकांना अत्यंत लाभदायक ठरेल. उत्पन्नात कायमस्वरूपीची वाढ होईल. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनपेक्षित पैसाही मिळू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायात लाभ होईल. मालमत्ता खरेदी करू शकता अथवा बुक करू शकता.
6 / 6
तुळ रास - वर्गोत्तम बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये जबरदस्त लाभ देईल. त्यांना नवीन नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. बेरोजगारांचा शोध संपेल. आदर वाढेल. पदोन्नती-वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. राजकारणात सक्रिय लोकांना फायदा होईल. कार्यक्षेत्रात हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य