Sun Transit in Gemini 2021: सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ ५ राशींना करिअरच्या दृष्टीने लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 03:36 PM2021-06-14T15:36:04+5:302021-06-14T15:40:17+5:30

Sun Transit in Gemini 2021: १५ जून २०२१ रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान होणार आहे. काही राशींच्या व्यक्तींना हे राशीपरिवर्तन शुभ असेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. तसेच सूर्य ऊर्जा आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो. साधारणपणे दर ३० दिवसांनी सूर्य रास बदलत असतो. म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी चलनाने मार्गक्रमण करत असतो. १५ जून २०२१ रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान होणार आहे.

आताच्या घडीला मिथुन राशीत बुध आणि शुक्र आहेत. यामुळे एकाच राशीत अनेक ग्रहांचा शुभ योग जुळून आला आहे. सूर्याच्या मिथुन प्रवेशामुळे काही राशींच्या व्यक्तींना आव्हाने, समस्या यांचा सामना करावा लागू शकतो. तर, काही राशींच्या व्यक्तींना हे राशीपरिवर्तन शुभ असेल, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या आहेत त्या पाच राशी? तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मेष : मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे वृषभ राशीतून मिथुन राशीत होणारा सूर्याचा प्रवेश सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. आगामी कालावधीत ऊर्जा, सकारात्मकता येऊ शकेल. आपले म्हणणे अधिक स्पष्टपणे आपण लोकांसमोर मांडू शकाल. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सौख्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळून स्वतःचे कौशल्य उत्तमरितीने दाखवण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. तसेच मित्रांसोबत हाती घेतलेले काही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

मिथुन: वृषभ राशीतून मिथुन राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी काळात बुद्धिचा पूरेपूर वापर करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. याशिवाय आरोग्य चांगले राहू शकेल. आगामी काळ गुंतवणुकीसाठी लाभदायक असल्याचे सांगितले जात आहे. नोकरदार वर्गाला चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

सिंह: सूर्याचा मिथुन राशीत होत असलेला प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. व्यवसाय, उद्योग, करिअरच्या दृष्टीने आगामी कालावधी उत्तम ठरू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा प्रभाव राहील. सरकारी विभागातील ओळखी वाढू शकतील. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागून काही प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

कन्या: सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशीत होत असलेला प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. आगामी काळ करिअरच्या दृष्टीने प्रगतीकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. काही व्यक्तींना नोकरीत प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. आपल्या कामाचा सहकारी वर्गावर प्रभाव पडू शकेल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतील. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर ख्याती वाढू शकेल, असे सांगितले जात आहे.

मकर: मिथुन राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. एखाद्या गूढ विषयाची रुची आगामी काळात वाढू शकेल. भाग्याची चांगली साथ लाभू शकेल. प्रगतीच्या नवीन वाटा, संधी उपलब्ध होऊ शकतील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्याला करिअर, मान-सन्मान यांचा कारक मानले गेले आहे. त्यामुळे सूर्याची उपासना करणे, सूर्याला अर्घ्य देणे, आदित्य स्तोत्राचे पठण करणे उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. तसेच प्रत्येक रविवारी सूर्याची आरती करणे, सूर्यसंबंधित वस्तुंचे दान करणे शुभ मानले जाते.