Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:07 IST2025-09-18T16:04:29+5:302025-09-18T16:07:44+5:30

Surya Grahan 2025:२१ सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येला सूर्य ग्रहण(Solar Eclipse 2025) आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, परंतु त्याचा शुभ अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडेल. अशुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडणार हे मागच्या लेखात पाहिले, या लेखात शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडणार ते पाहू.

चंद्र असो वा सूर्यग्रहण सूर्यग्रहण, जनमानसावरच नाही तर पृथ्वीतलावर पडतो. त्याबरोबरच ग्रहमान कसे असते यावर राशींचे भविष्य अवलंबून असते. सर्व पित्री अमावास्येला या वर्षातले शेवटचे सूर्य ग्रहण असणार आहे. या तिथीला सूर्य, चंद्र आणि बुध ग्रह कन्या राशीत असणार आहे आणि पुढील राशींना होणार आहे.

वृषभ : सूर्यग्रहण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे तुम्ही पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला करिअरमध्ये सर्वांगीण फायदे मिळू शकतात. या महिन्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तुमचे बोलणे देखील सुधारेल आणि तुमच्या बोलण्याचा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल.

सिंह : सूर्यग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची बचत वाढेल. या काळात तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुम्हाला नशीबही साथ देईल.

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तुमच्या कुटुंबाकडूनही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता. तुमच्या वैयक्तिक जीवनात वैवाहिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कनिष्ठ आणि वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो. या काळात विरोधक शांत झाल्यामुळे व्यवसायिकांना मानसिक शांती मिळेल. तरुणांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल. तुमच्या नियोजित योजना देखील यशस्वी होतील.

मकर : सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी दान धर्म केला असता तुमची ग्रहस्थिती सुधारेल आणि पितरांचेही आशीर्वाद मिळतील. वैवाहिक जीवनात नवी सुरुवात होईल. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ येईल. नवीन कार्यास आरंभ कराल. उत्पन्नाचे स्रोत वाढल्यामुळे आनंदी व्हाल. आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल.

कुंभ : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. व्यावसायिकांना नवरात्र लाभदायी ठरेल. कौटुंबिक कलह थांबून शांतता आणि समाधान याची अनुभूती घ्याल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. छोट्या गोष्टीतूनही आनंद मिळेल. घरच्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे नवीन क्षेत्रात स्वतःला आजमवाल. गुंतवणूक करताना कागदपत्र तपासून घ्या.

मीन : शनिदेवाच्या कृपेने तसेच पितरांच्या आशीर्वादाने अडलेल्या कामांना गती मिळेल आणि यशाचे नवे दालन तुमच्यासाठी खुले होईल. नवीन संधी तुमचा उत्साह वाढवतील आणि त्याबरोबरच उत्पन्नातही वाढ होईल. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील पण ते ही हिताचे ठरतील. नोकरी, व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील आणि कौटुंबिक सौख्य लाभल्याने समाधान मिळेल.