शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३० वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना नवरात्रौत्सव शानदार, देवीचे वरदान; राजयोगाचा शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 3:03 PM

1 / 9
१५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापना आहे. या दिवशीपासून अश्विन मासारंभ होत असून, पुढील नऊ दिवस नवरात्रौत्सव साजरा केला जाईल. देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याच नवरात्रात काही शुभ, अद्भूत योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो.
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रारंभ होताना कन्या राशीत सूर्य आणि बुध दोन ग्रह विराजमान असतील. या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा एक राजयोगही मानला जातो. नवरात्रारंभाच्या काही दिवसांनी सूर्य आणि बूध एक दिवसाच्या अंतराने तूळ राशीत प्रवेश करतील. यावेळीही हा बुधादित्य योग कायम असणार आहे.
3 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रारंभाच्या सुरुवातीला बुधादित्य योग हा सुमारे ३० वर्षांनी जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. दुर्गा देवीच्या कृपेने या योगाचे ५ राशीच्या व्यक्तींना अद्भूत लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. अपार यश-प्रगतीच्या संधी, धन-धान्य आणि पैशांची कमतरता जाणवणार नाही, असे सांगितले जात आहे.
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना नवरात्रारंभ शुभ ठरू शकेल. देवी दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनाचे सुख मिळू शकते. कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळवू शकता. कुठूनतरी चांगली नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यवसायात आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. आर्थिक स्थिती सुधारेल.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना नवरात्रारंभ लाभदायक ठरू शकेल. नवरात्र काळात देवी दुर्गेची कृपा आणि बुद्धादित्य योगाच्या प्रभावामुळे बरेच दिवस अडकलेले धन मिळण्याची आशा आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. अधिकारी वर्ग कामाची प्रशंसा करतील. ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुलांच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना नवरात्रारंभ अनुकूल ठरू शकतो. बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक मानला जातो. देवी दुर्गा कृपा करेल. आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात सन्मान वाढेल. मित्रांच्या सहकार्याने अनेक प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील. कुठूनतरी चांगली नोकरीची बातमी येऊ शकते. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना कामात यश मिळेल आणि. मार्ग सुकर होईल.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना नवरात्रारंभ सकारात्मक ठरू शकेल. यशाच्या अनेक शुभ संधी मिळतील. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेचा उपवास केल्याने अपेक्षित फळ मिळू शकेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित वाद मिटू शकतो. सोने खरेदीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना नवरात्राचा काळ वरदानासारखा ठरू शकतो. काही चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होईल. लोखंडाच्या व्यापारात गुंतलेल्यांचा नफा दुप्पट वेगाने वाढेल. घरात भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कामावर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
9 / 9
नवरात्रारंभ झाला की, १७ ऑक्टोबर आणि १८ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध तूळ राशीत प्रवेश करेल.- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Navratriनवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य